आयात डाळसाठ्यांवरचे निर्बंध उठवले
By Admin | Updated: November 3, 2015 03:01 IST2015-11-03T03:01:23+5:302015-11-03T03:01:23+5:30
परदेशातून आयात केलेल्या डाळींवरील साठा निर्बंध उठविण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. या निर्णयामुळे मुंबईतील बंदरांमध्ये अडकून पडलेला डाळीचा साठा खुल्या बाजारात

आयात डाळसाठ्यांवरचे निर्बंध उठवले
मुंबई : परदेशातून आयात केलेल्या डाळींवरील साठा निर्बंध उठविण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. या निर्णयामुळे मुंबईतील बंदरांमध्ये अडकून पडलेला डाळीचा साठा खुल्या बाजारात विक्रीस येण्यास मदत होणार आहे.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार डाळ, खाद्यतेले व खाद्यतेले बिया यांच्या साठवणुकीवर १९ आॅक्टोबरपासून निर्बंध लागू केले होते. यामध्ये परदेशातून आयात केलेल्या डाळींचाही समावेश होता. त्यामुळे साठा अडकून पडला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आयात डाळींवरील साठा निर्र्बध उठविण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसा आदेशदेखील काढण्यात आला. त्यामुळे या डाळींची आयात करता येईल पण एकदा आयात केल्यानंतर त्यांची साठेबाजी करण्यावरील निर्बंध कायम राहणार आहेत.
ही सवलत केवळ आयातदारांना लागू असेल. आयातदाराने प्रथम विक्री केल्यानंतर व्यापाऱ्यांना साठ्याबाबतचे निर्बंध लागू राहतील. (विशेष प्रतिनिधी)