शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भरमसाट फी आकारणाऱ्या खासगी शाळांवर ठेवणार अंकुश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 03:23 IST

राज्यात ८ ठिकाणी शुल्क नियामक समिती; पालकांना करता येणार तक्रार

मुंबई : चार महिन्यांपासून मान्यतेच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील शुल्क नियामक समितीच्या मान्यतेचा प्रश्न सोमवारी निकाली निघाला. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील आठ विभागीय शुल्क नियामक समिती आणि एका पुनरीक्षण समितीच्या स्थापनेची घोषणा केली. यामुळे राज्यात भरमसाठ फी आकारणाºया शाळांवर अंकुश बसेल. पालकांनाही या समितीपुढे तक्रारीची सोय करण्यात आली आहे.गेल्या वर्षी नोव्हेंबर, २०१९ मध्ये शुल्क नियामक समित्यांचा कार्यकाळ संपला. मात्र, राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे समित्यांची मान्यता रखडली होती. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाशी संबंधित विविध घटकांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम हाती घेतला. अलीकडेच पालक संघटनांशी चर्चेदरम्यान शुल्क नियामक समित्यांच्या मंजुरीचा मुद्दा पुढे आला. त्यानुसार, हा निर्णय घेण्यात आला.उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली पुनरीक्षण समितीच्या स्थापनेस मान्यता देण्यात आली आहे. पुनरीक्षण समिती व प्रत्येक शैक्षणिक विभागासाठी एक, याप्रमाणे आठ विभागीय शुल्क नियामक समित्या लवकरच यासंदर्भातील कामकाज सुरू करतील, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.खासगी शाळेतील शुल्काबाबत त्या-त्या विभागातील शाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांना संबंधित विभागीय समितीकडे दाद मागता येईल. त्यामुळे पालक व शिक्षण संस्था दोघांनाही दिलासा मिळेल, असा विश्वास शिक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला.समिती कशासाठी?राज्यातील खासगी शिक्षण संस्थांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये व संबंधित शिक्षण संस्थांमध्ये शाळेच्या शुल्कावरून वारंवार वाद होतात. पालक संबंधित शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालकांकडे दाद मागतात. मात्र, ही प्रकरणे निकाली निघण्यास विलंब लागत असे. यावर कायदेशीर पद्धतीने व विनाविलंब तोडगा काढण्यासाठी व दोन्ही पक्षांना न्याय देण्यासाठी सक्षम व कायदेशीर यंत्रणेची आवश्यकता निर्माण झाल्याने, शुल्क नियामक समित्यांबाबतचा कायदा करण्यात आला.असे चालेल कामकाज : महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) कायद्यान्वये राज्यातील आठ शैक्षणिक विभागांसाठी आठ विभागीय समित्या व राज्य स्तरावर एक पुनरीक्षण समिती स्थापन करण्याची तरतूद आहे. सेवानिवृत्त जिल्हा न्यायधीशांच्या अध्यक्षतेखाली या विभागीय समित्या काम करतील, तर प्रादेशिक शिक्षण उपसंचालक हे या समितीचे पदसिद्ध सचिव असतील. पुनरीक्षण समितीचे अध्यक्ष पद उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांकडे देण्यात येईल. माध्यमिक व उच्च माध्यमिकचे शिक्षण संचालक हे पदसिद्ध सचिव म्हणून काम पाहतील.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण