जबाबदारी उचलली पाहिजे - जयंत पाटील
By Admin | Updated: June 8, 2016 02:23 IST2016-06-08T02:23:19+5:302016-06-08T02:23:19+5:30
समाजातील बुद्धिवान लोकांनी थोडा पुढाकार घेऊन समाज परिवर्तनाची जबाबदारी उचलली पाहिजे

जबाबदारी उचलली पाहिजे - जयंत पाटील
मुरुड / नांदगाव- समाजातील बुद्धिवान लोकांनी थोडा पुढाकार घेऊन समाज परिवर्तनाची जबाबदारी उचलली पाहिजे, तरच भावी पिढी सक्षम व सर्व स्तरात अग्रेसर राहील, असे प्रतिपादन आमदार जयंत पाटील यांनी मुरु ड येथे केले. पंचक्रोशीतील आगरी समाज नांदगाव व माजगाव विभागीय सामाजिक संस्था उसरोली यांच्या वतीने आयोजित बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले की, सध्याचे युग हे स्पर्धात्मक असून आता मुलांनी इंग्रजी माध्यमातून शिकवणे आवश्यक आहे. बीएड तर आता करूच नये, कारण नोकरी मिळणे आता दुरापास्त आहे. सिव्हिल व मेकॅनिकल जॉबच विद्यार्थ्यांना तारू शकतील, तेव्हा बदलत्या युगाप्रमाणे ट्रेड शोधण्याचे काम विद्यार्थ्यांनी केले पाहिजे.
आगरी समाजाने अकरा गावापुरती संघटना न ठेवता मुरु ड तालुक्याची संपूर्ण संघटना व्हावी अशी इच्छा यावेळी त्यांनी व्यक्त केली. बहुजन समाजाला मिळणाऱ्या सर्व सुविधा नष्ट होत आहेत, यासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरु न आंदोलन करू असा इशारा यावेळी त्यांनी दिला. या कार्यक्र मात इयत्ता पहिली ते बारावी परीक्षेत गुणवत्ता मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष शरद काबुकर, उपाध्यक्ष नारायण पाके, श्याम पाटील, चंद्रकांत कमाने, दामोदर राऊत, दिनेश शापुरकर, गणेश गाणार आदि मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)