न्यायसंस्थेवर समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी
By Admin | Updated: August 11, 2015 01:17 IST2015-08-11T01:17:30+5:302015-08-11T01:17:30+5:30
न्यायसंस्थेवर समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याची महत्त्वाची जबाबदारी असून त्यासाठी शक्य ते प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह यांनी व्यक्त केले.

न्यायसंस्थेवर समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी
नागपूर : न्यायसंस्थेवर समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याची महत्त्वाची जबाबदारी असून त्यासाठी शक्य ते प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह यांनी व्यक्त केले.
मुख्य न्यायमूर्ती शाह यांच्या हस्ते ई-कोर्टचे उद्घाटन करण्यात आले. यासह मुंबई उच्च न्यायालय व औरंगाबाद खंडपीठानंतर नागपूर खंडपीठातही ई-कोर्टला सुरुवात झाली. न्यायव्यवस्था अधिक कार्यक्षम करणे, न्यायदानात पारदर्शकता आणणे, नागरिकांना वेळेत न्याय देणे, न्यायदानाची संख्या व गुणवत्ता वाढविणे इत्यादी उद्देश या संकल्पनेमागे आहेत.
समाजाला न्यायसंस्थेकडून वेळेवर व कमी खर्चात न्याय हवा आहे. ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सोमवारपासून सुरू झालेले ‘ई-कोर्ट’ हे न्यायसंस्थेतील तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीचे पुढचे पाऊल आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
अतुल चांदूरकर पहिले ई-न्यायमूर्ती
अतुल चांदूरकर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील पहिले ई-न्यायमूर्ती ठरले आहेत. त्यांच्या न्यायपीठात ई-कोर्ट स्थापन करण्यात आले आहे. चांदूरकर यांची २१ जून २०१३ रोजी अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली.
बार असोसिएशनतर्फे सत्कार
मुख्य न्यायमूर्ती शाह येत्या सप्टेंबरमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. यानिमित्त हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरतर्फे सोमवारी त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.