मेट्रो-३ च्या विद्युतीकरणाला प्रतिसाद
By Admin | Updated: June 9, 2016 07:15 IST2016-06-09T07:15:20+5:302016-06-09T07:15:20+5:30
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गाचे विद्युतीकरण आणि संकर्षणाच्या (ट्रॅक्शन) कामाकरिता नामांकित कंपन्यांकडून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला भरघोस प्रतिसाद मिळाला

मेट्रो-३ च्या विद्युतीकरणाला प्रतिसाद
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गाचे विद्युतीकरण आणि संकर्षणाच्या (ट्रॅक्शन) कामाकरिता नामांकित कंपन्यांकडून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. यासाठी पूर्व अर्हता अर्ज मंगळवारी सादर करण्यात आले असून, विद्युत क्षेत्रातील ज्या कंपन्यांनी पूर्व अर्हता अर्ज दाखल केले, त्यामध्ये एल अँड टी, एलस्टॉम, कोब्रा, टाटा प्रोजेक्ट्स, आयसोलक्स, ब्राइट पॉवर केईआय, सीमेन्स, लीना पॉवरटेक इंजिनीअरिंग, कनोहार इलेक्ट्रिकल्स या कंपन्यांचा समावेश आहे. मेट्रोच्या विद्युतीकरणाचे काम दोन पॅकेजमध्ये विभागले असून, यासाठी एकूण १३ निविदा दाखल झाल्या आहेत. या संदर्भात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले की, 'मेट्रो-३ स्थानकांचे विद्युतीकरण, लिफ्ट्स, एस्केलेटर्स, व्हेंटिलेशन, एअर कंडिशनिंगसारख्या महत्त्वाच्या कामामध्ये विद्युतीकरणाची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. या कामासाठी नामांकित कंपन्यांकडून पूर्व अर्हता अर्ज प्राप्त झाले असून, प्राप्त अर्जांचे मूल्यांकन ६0 दिवसांत पूर्ण करण्यात येईल. मेट्रो-३ च्या विद्युतीकरणाचे काम सवरेत्कृष्ट कंपनीला देण्यात येईल.' (प्रतिनिधी)