विष्णू वाघ यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2016 22:16 IST2016-08-20T22:16:58+5:302016-08-20T22:16:58+5:30
उपसभापती व साहित्यिक विष्णू वाघ यांची प्रकृती पुन्हा ठिक होऊ शकते, अशी आशा काल शनिवारी जागी झाली व गोव्यात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विष्णू वाघ यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २० : उपसभापती व साहित्यिक विष्णू वाघ यांची प्रकृती पुन्हा ठिक होऊ शकते, अशी आशा काल शनिवारी जागी झाली व गोव्यात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघ यांना गेल्या 15 रोजी दुस:यांदा हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना 18 रोजी अत्यवस्थ स्थितीत बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळातून मुंबई येथील हिंदुजा इस्पितळात हलविण्यात आले होते. हिंदुजामध्ये देशातील अतिशय तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक वाघांवर उपचार करत आहे.
वाघ यांनी उपचारांना प्रतिसाद देणो सुरू केले आहे,असे डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती कला अकादमीचे उपाध्यक्ष सुशांत खेडेकर यांनी दिली. खेडेकर हे हिंदुजा इस्पितळात होते, ते शनिवारी गोव्यात परतले. वाघ अतिदक्षता विभागात असून वाघ यांच्या डोळ्य़ांनी हालचाल केल्याचे आयसीयूमधील डॉक्टरांनी पाहिल्याचे खेडेकर यांचे म्हणणो आहे. वाघ यांच्या आरोग्याबाबत एक चाचणी शनिवारी सायंकाळी डॉक्टरांकडून करण्यात आली. ती सकारात्मक असून त्यामुळे वाघ पुन्हा ठिक होण्याची आशा निर्माण झाली आहे, असे खेडेकर म्हणाले. वाघ यांच्या पत्नी अरुणा वाघ ह्या हिंदुजा इस्पितळात असून वाघ यांच्या आरोग्यात सुधारणा होत असल्याचे व आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अरुणा यांनीही जाहीर केले आहे. कुणीच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.