जीवनात संकल्प महत्त्वाचा
By Admin | Updated: September 19, 2014 00:55 IST2014-09-19T00:55:03+5:302014-09-19T00:55:03+5:30
एक रुपयाने व्यवसाय सुरू करणाऱ्या धीरुभाई अंबानीनी जगभरात व्यवसायाचा विस्तार केला. शिक्षणाची व्यवस्था नसतानाही अब्दुल कलाम देशाचे राष्ट्रपती बनले. मोहनदास करमचंद गांधी

जीवनात संकल्प महत्त्वाचा
सुवीरसागर महाराज : श्री सैतवाळ जैन संघटन मंडळाचा उपक्रम
नागपूर : एक रुपयाने व्यवसाय सुरू करणाऱ्या धीरुभाई अंबानीनी जगभरात व्यवसायाचा विस्तार केला. शिक्षणाची व्यवस्था नसतानाही अब्दुल कलाम देशाचे राष्ट्रपती बनले. मोहनदास करमचंद गांधी या एका सर्वसामान्य माणसाने इंग्रजाविरोधात लढा उभारून देश स्वतंत्र केला. या सर्व महान व्यक्तींच्या जीवनात एक संकल्प होता. त्यामुळेच हे महान बनले. जो आपल्या जीवनात संकल्प करेल, तो नक्कीच महान बनेल, असे उद्बोधन मुनीश्री सुवीरसागरजी महाराज यांनी चिटणीस पार्क येथे सुरू असलेल्या प्रवचनमालेत श्रावकांना केले.
श्री सैतवाळ जैन संघटन मंडळाच्यावतीने ‘एक और शंखनाद’ या प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवचनमालेच्या तिसऱ्या दिवशी मुनीश्रींनी ‘संकल्प की आवाज’ यावर उद्बोधन केले. ते म्हणाले की, प्रत्येक माणसाने जीवनात एक ध्येय ठेवावे. ध्येयाबरोबर संकल्प असल्यास, यश नक्कीच पदरात पडेल.
आजचे पालक मुलांना सिनेमातील अभिनेते, अभिनेत्रीचे नाव देतात. मात्र पुढे ही मुले पालकांसाठी हीरो नाही झिरो बनतात. मुलांना चांगले संस्कार देणे ही देवाची पूजा आहे. मंदिरात मूर्ती नसली तरी चालेल, मात्र मुलांना मंदिरात जाण्यास शिकवावे, जेणेकरून मानवतेचे मंदिर तयार होईल. या प्रवचनमालेला सुनीलकुमार जैन, सनतकुमार जैन, सुभाष कोटेचा, दयाशंकर तिवारी, कुलभूषण डहाळे, सुरेश आग्रेकर, संतोष जैन, डॉ. विनय रोडे, कमलकांत गोंदवाले, कुणाल गडेकर, नीरज पळसापुरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)