शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ठराव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 06:35 IST

शिवसेनेतील सर्वात मोठ्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनात ही बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे आले तेव्हा शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून त्यांचे स्वागत केले.

मुंबई : शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्याचा ठराव शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शनिवारी करण्यात आला. त्यामुळे आता सहा मंत्र्यांसह आमदारांबाबत ठाकरे काय निर्णय घेतात, याबाबत उत्सुकता आहे.

शिवसेनेतील सर्वात मोठ्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनात ही बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे आले तेव्हा शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून त्यांचे स्वागत केले. कार्यकारिणीने मंजूर केलेल्या सहा ठरावांमध्ये म्हटले आहे की, शिवसेना ही बाळासाहेबांची होती, आहे आणि राहील. इतर कुणीही स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरू शकत नाही. तसे केल्यास रीतसर तक्रार आणि कारवाई करण्यासाठीची पावले उचलली जातील. शिवसेनेने आपल्या ठरावात पुन्हा एकदा मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नसल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक महानगरपालिकेवर भगवा फडविण्याच्या निर्धार अन्य एका ठरावाद्वारे करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी आजवर पक्षाच्या प्रगतीसाठी केलेले काम आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोरोनाकाळात केलेले उल्लेखनीय काम याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला.

नाथ होते, आता दास झाले शिवसेना एक निखारा आहे, त्यावर पाय ठेवाल तर जळाल असा इशारा उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिला. स्वत:च्या बापाच्या नावानं मते मागा, आधी नाथ होते आता दास झाले. बंडखोरांना त्यांचा निर्णय आधी घेऊ द्या, शिवसैनिकांचे प्रेम माझ्यावर आहे असे ते म्हणाले. गद्दारांना परत घेऊ नका अशी मागणी कार्यकारिणीतील नेत्यांनी केली. त्यावर त्यांना परत घेणार नाही, असे ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना