शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

सारथी संस्थेबाबत खोटी व दिशाभूल वक्तव्ये करणाऱ्या वडेट्टीवारांचा राजीनामा घ्या; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 7:50 PM

शाहू महाराजांचे जिवंत स्मारक सारथी संस्थेबाबत वडेट्टीवार यांनी खोटी व दिशाभूल करणारी विधाने

ठळक मुद्दे‘सारथी’वरुन मराठा समाज संतप्त

पुणे : ‘‘राज्य सरकारमधील मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा सारथी संस्थेबाबतचा दृष्टीकोन भेदभावाचा आहे. शाहू महाराजांचे जिवंत स्मारक सारथी संस्थेबाबत वडेट्टीवार यांनी खोटी व दिशाभूल करणारी विधाने जागोजागी केली आहेत,’’ असे म्हणत मराठा क्रांती मोर्चाने वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.सारथीची स्वायत्तता कायम राखण्याबाबत छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावतीने मंत्री एकनाथ शिंदे यांनी जो शब्द पुण्यात दिला तो पाळावा, असेही आवाहन मराठा क्रांती मोर्चाने केले आहे. मोर्चाचे प्रतिनिधी राजेंद्र कोंढरे, राजेंद्र कुंजीर, रघुनाथ चित्रे, सचिन आडेकर, तुषार काकडे, धनंजय जाधव, सचिन दरेकर, बाळासाहेब अमराळे, श्रुतीका पाडळे, अमर पवार, हनुमंत मोटे, सुशिल पवार, नाना निवंगुणे, मंगेश जाधव, निरंजन गुंजाळ, सुवर्णा पाटील आदींनी या संदर्भातील प्रसिद्धीपत्रक सोमवारी (दि. ६) पुण्यात काढले.  

विजय वडेट्टीवार यांनी नुकताच पुणे दौरा केला. यावेळी वडेट्टीवार यां

नी ‘सारथी’ची स्वायत्तता कायम ठेवून त्यास जास्तीत जास्त निधी देऊ असे आश्वासन दिले. गेली सहा महिने ते हेच विविध बैठकीत सांगत आहेत. प्रत्यक्षात ‘सारथी’च्या कारभारात स्वायत्तता नसून मंत्रीकेंद्रीत शासन निर्णय घेत आहे. आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या नव्या संचालक मंडळाला नामधारी ठेवण्यात आले आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला. चालू योजना बंद करुन विद्यार्थ्यांना विद्यावेतनासाठी रखडवले आहे. महाआघाडी सरकारने एकही नवी योजना सुरु केलेली नाही. संस्थेने पाठवलेले प्रस्ताव देखील शासन स्तरावर प्रलंबित आहेत, असेही मोर्चाने म्हटले आहे. 

...........................मोर्चाच्या मागण्या-नोव्हेंबर २०१९ पासून आजपर्यंत ‘सारथी’ला प्राप्त निधी आणि खर्च निधी तसेच ‘सारथी’च्या चालू योजना व नवे प्रकल्प यांची माहिती ‘सारथी’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करा.- मराठा आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसाठी शासनास आवश्यक ती मदत करण्यास आम्ही तयार आहोत. हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी आता महाविकास आघाडीची आहे. 

............................................................वडेट्टीवारांकडून ‘सारथी’ काढून घ्याएकनाथ शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांना ‘सारथी’तून हटवतो अशी घोषणा केली. परंतु तसे न होता गुप्तांना संचालक केले गेले. ‘सारथी’चा तारादूत प्रकल्प बंद करण्यात आला आहे. त्यानंतर मराठा समाजाने आंदोलने, उपोषणे केली तरी राज्य सरकारने लक्ष दिले नाही. ‘सारथी’चे चाक रुतून पडण्यास वडेट्टीवार आणि त्यांचा विभागच जबाबदार आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांच्याकडून एसबीसी प्रवर्ग आणि सारथी विभाग काढून घ्या.-मराठा क्रांती मोर्चा

टॅग्स :PuneपुणेMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरे