रेल्वे व्यवस्थापनासमोर रहिवासी मांडणार व्यथा
By Admin | Updated: April 30, 2016 02:34 IST2016-04-30T02:34:25+5:302016-04-30T02:34:25+5:30
जुईनगरमधील रेल्वे कॉलनीची दुरवस्था झाली आहे. मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये जीव मुठीत घेवून राहावे लागत आहे.

रेल्वे व्यवस्थापनासमोर रहिवासी मांडणार व्यथा
नवी मुंबई : जुईनगरमधील रेल्वे कॉलनीची दुरवस्था झाली आहे. मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये जीव मुठीत घेवून राहावे लागत आहे. येथील रहिवासी शनिवारी रेल्वे व्यवस्थापनाची भेट घेवून त्यांच्यासमोर व्यथा मांडणार आहेत.
रेल्वे प्रशासनाने सानपाडामध्ये कारशेड तयार केल्यानंतर जुईनगरमध्ये कर्मचाऱ्यांसाठी वसाहत उभारली परंतु येथील इमारतीची योग्य डागडुजी करण्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे अनेक इमारतीचे काम अर्धवट अवस्थेत राहिले आहे. अनेक इमारती धोकादायक बनल्या आहेत. रेल्वे कर्मचारी या धोकादायक इमारतींमध्ये परिवारासह जीव मुठीत घेवून रहात आहेत.
लोकमतने येथील समस्यांना वाचा फोडल्यानंतर प्रशासन काही प्रमाणात जागे झाले. स्थानिक नगरसेविका रुपाली भगत व निशांत भगत यांनी खासदार राजन विचारे व रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा
करुन येथील समस्या सोडविण्याची मागणी केली. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक ३० एप्रिलला आयोजित केली आहे. या बैठकीला खासदार राजन विचारे,
काँग्रेस जिल्हाध्यक्ष दशरथ भगत व रहिवाशांचे शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहे.
रेल्वे कॉलनीमधील धोकादायक व अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीचा पुनर्विकास करण्यात यावा. वसाहतीमधील रस्ते व गटारांची डागडुजी करण्यात यावी मलनि:सारण वाहिन्या नवीन टाकून त्या महापालिकेच्या वाहिन्यांना जोडण्यात याव्या. कॉलनीमधील उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात यावे व
इतर समस्यांवर चर्चा केली
जाणार असल्याची माहिती निशांत भगत यांनी दिली आहे.
(प्रतिनिधी)