उल्हासनगरवासीयांना धोकादायक इमारती बाबत खुशखबर मिळणार- कुमार आयलानी
By सदानंद नाईक | Updated: December 2, 2022 16:55 IST2022-12-02T16:55:21+5:302022-12-02T16:55:37+5:30
उल्हासनगरातील अवैध बांधकामे व धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी करण्यासाठी नेमलेल्या समितीने मुख्यमंत्री यांना अहवाल दिला.

उल्हासनगरवासीयांना धोकादायक इमारती बाबत खुशखबर मिळणार- कुमार आयलानी
उल्हासनगर :
शहरातील धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी करण्याचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाइंचे अध्यक्ष व केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते लवकरच प्रसिद्ध होणार असून शहरवासीयांना खुशखबर मिळणार असल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली. याच बरोबर महापालिका रुग्णालयसह अन्य विकास कामाचे उदघाटन होणार असल्याचे संकेत आयलानी यांनी दिले आहे.
उल्हासनगरातील अवैध बांधकामे व धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी करण्यासाठी नेमलेल्या समितीने मुख्यमंत्री यांना अहवाल दिला. अहवालावर तज्ज्ञाकडून अंतिम हात फिरविला जात असल्याची माहिती यापूर्वी आमदार कुमार आयलानी यांनी दिली होती. मुंबई येथे आरोग्य विभागाचा कार्यक्रम संपन्न झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीयमंत्री रामदास आठवले व आमदार कुमार आयलानी एकाच व्यासपीठावर प्रमुख पाहुणे होते. यावेळी आमदार कलानी यांनी शहरातील अवैध बांधकामे नियमित करणे व धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लवकर निर्णय घेण्याची विनंती केली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या समवेत शहरात येण्याचे संकेत दिले. तसेच यावेळी धोकादायक इमारत पुनर्बांधणी बाबत नेमलेल्या समिती दिलेला अहवाल प्रसिद्ध करणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितल्याचे आयलानी म्हणाले.
महापालिकेने उभारलेले २५० बेडचे रुग्णलाय गेल्या दोन वर्षां पासून उदघटनाच्या प्रतिक्षेत आहे. महापालिका रुग्णालयसह अग्निशमन विभागाच्या उंच शिड्या असलेल्या गाड्या, उल्हास नदी घाट, तहसीलदार कार्यालया शेजारील प्रशासकीय इमारत आदीचे उदघाटन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व केंद्रीयमंत्री आठवले यांच्या हस्ते होणार आहे. महापालिकेने रुग्णालय सज्ज ठेवले असून रिजेन्सी अंटेलिया येथील सभागृहात सभेचे आयोजनही करण्यात येणार असल्याची चर्चा शहरात रंगली. आमदार कुमार आयलानी यांनी यावृत्ताला दुजोरा दिला आहे.