निवासी डॉक्टरांवर हल्ल्यांचे सत्र सुरूच

By Admin | Updated: March 19, 2017 20:49 IST2017-03-19T20:49:51+5:302017-03-19T20:49:51+5:30

सायन रुग्णालयात शनिवारी रात्री सुरक्षारक्षकांसमोर रुग्णांच्या नातेवाईकांनी निवासी डॉक्टर रोहित कुमार यांच्यावर हल्ला केला.

Residents have started an attack session | निवासी डॉक्टरांवर हल्ल्यांचे सत्र सुरूच

निवासी डॉक्टरांवर हल्ल्यांचे सत्र सुरूच

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - धुळे, नाशिक येथील निवासी डॉक्टरांवरील हल्ल्याचे प्रकरण निवळत नाही, तोच पुन्हा सायन रुग्णालयात शनिवारी रात्री सुरक्षारक्षकांसमोर रुग्णांच्या नातेवाईकांनी निवासी डॉक्टर रोहित कुमार यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. मात्र या आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती सायन पोलिसांनी दिली.

या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभरातील शासकीय आणि महापालिका रुग्णालयांतील ४ हजार ५०० निवासी डॉक्टरांनी रविवारी सायंकाळी आठ वाजल्यापासून मासबंक केला आहे. तर रविवारी सायंकाळी सायन रुग्णालयातही निवासी डॉक्टरांनी कँडल मार्च काढून या प्रकरणी निषेध नोंदविला. या घटनेनंतर पुन्हा एकदा राज्यभरातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरवर झालेला हल्ला दुर्दैवी असून याप्रकरणी त्वरित पोलीस प्रशासनाला कळवून कार्यवाही करण्यात आली आहे. यानंतर भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आणि डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुलेमान मर्चंट यांनी दिली.

Web Title: Residents have started an attack session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.