रिसॉर्टमालक अटकेत
By Admin | Updated: July 4, 2016 03:53 IST2016-07-04T03:53:51+5:302016-07-04T03:53:51+5:30
मॉडेलिंगचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला मदत केल्याप्रकरणी तुळींज पोलिसांनी एका रिसॉर्ट मालकाला अटक केली आहे

रिसॉर्टमालक अटकेत
वसई : फेसबुकवर बनावट खाती उघडून तरुणींना मॉडेलिंगचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला मदत केल्याप्रकरणी तुळींज पोलिसांनी एका रिसॉर्ट मालकाला अटक केली आहे. यात आणखी काही रिसॉर्ट मालकही पोलिसांच्या रडारवर असून त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. याप्रकरणात आरोपीला साथ देणारा साथीदार पसार झाला आहे.
एका १९ वर्षी कॉलेज युवतीने मॉडेलिंंगच्या नावाखाली फसवणूक करून तरुणींचे लैंगिक शोषण होत असल्याचा प्रकार उजेडात आणला होता. आपली एक मैत्रिण यात अडकल्यानंतर या मुलीने पोलिसांच्या मदतीने सापळा रचून मुख्य आरोपी ंिरंकू यादव (२५) याला पकडून दिले होते. आपणाला मॉडेलिंगमध्ये रस असल्याचे सांगून त्या तरुणीने रिंकूशी संपर्क साधला होता. रिंकू तिला घेऊन कळंब येथील एका रिसॉर्टमध्ये घेऊन जात असतानाच त्या तरुणीने पोलिसांना बोलावून त्याला पकडून दिले.
सिनेसृष्टीशी काही संबंध नसलेला रिंकूच्या जाळ्यात फसलेल्या मुलींना रिसॉर्टमध्ये घेऊन जात असे. त्याठिकाणी गुंगीचे औषध पाजून बलात्कार करीत असे व त्याची चित्रफित बनवून ती इंटरनेटवर टाकण्याची धमकी देऊन त्यांना ब्लॅकमेल करीत असे. दोन मुलींच्या तक्रारीनंतर तुळींज पोलिसांनी बलात्कार, फसवणूक, सायबर अॅक्ट, पोक्सोे आदी गुन्ह्यांमध्ये रिंकूला अटक केली आहे.
संबंधित लॉजचा तपास करून पोलिसांनी त्यांच्या मालकांवरही गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरु केली आहे. आतार्पंत एका रिसॉर्ट मालकाला पोलिसांनी अटक केली असून आणखी काही जणांवर कारवाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)