शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण कायम राहावे हीच संघाची भूमिका, कॉंग्रेसकडून भ्रामक प्रचार सुरू असल्याचा संघाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 23:50 IST

आरक्षण कायम रहावे या भूमिकेचा पुनरुच्चार करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. कॉंग्रेस पक्ष व राहुल गांधी सातत्याने संघाविरोधात चुकीचा प्रसार करत आहेत, असा आरोप संघातर्फे करण्यात आला आहे.

नागपूर - आरक्षण कायम रहावे या भूमिकेचा पुनरुच्चार करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. कॉंग्रेस पक्ष व राहुल गांधी सातत्याने संघाविरोधात चुकीचा प्रसार करत आहेत, असा आरोप संघातर्फे करण्यात आला आहे. यासंदर्भात संघाचे सहसरकार्यवाह डॉ.मनमोहन वैद्य यांनी पत्रक जारी केले आहे.कॉग्रेसच्या ‘फेसबुक पेज’वरुन माझ्या आणि सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्याविरोधात भ्रामक प्रचार सुरू आहे. संघाला अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आरक्षण संपवायचे आहे, असा दावा कॉंग्रेसकडून करण्यात येत आहे. ही बाब तथ्यहीन व खोटी आहे.  कॉंग्रेसच्या या राजकारणाचा आम्ही निषेध करतो. राहुल गांधी यांनी यासंदर्भात अधिकृत संदर्भ किंवा पुरावे सादर करावे, असे आव्हानच डॉ. वैद्य यांनी दिले आहे. हिंदू समाजातील सामाजिक भेदभावामुळेच अनुसूचित जाती- जमातीच्या नागरिकांना संविधानाच्या माध्यमातून आरक्षण प्राप्त झाले आहे. संघाचीदेखील हीच भूमिका आहे. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेतदेखील वेळोवेळी याबाबत मंथन झाले आहे. समाजातून सामाजिक भेदभाव संपुष्टात यावा व समरसता निर्माण व्हावी यासाठी संघ कटिबद्ध व कार्यरत आहे, असेदेखील डॉ. वैद्य यांनी प्रतिपादन केले आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMaharashtraमहाराष्ट्रreservationआरक्षण