मराठा अन् मुस्लिम समाजाला ‘अभियांत्रिकी’त आरक्षण
By Admin | Updated: July 20, 2014 01:34 IST2014-07-20T01:34:25+5:302014-07-20T01:34:25+5:30
मराठा समाजाला अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशामध्ये आरक्षण देण्याचे परिपत्रक तंत्रशिक्षण संचालकांनी काढल्यानंतर आता सोमवारी मुस्लिम समाजालादेखील आरक्षण देण्याबाबतचा आदेश काढण्यात येणार आहे.

मराठा अन् मुस्लिम समाजाला ‘अभियांत्रिकी’त आरक्षण
मुंबई : मराठा समाजाला अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशामध्ये आरक्षण देण्याचे परिपत्रक तंत्रशिक्षण संचालकांनी काढल्यानंतर आता सोमवारी मुस्लिम समाजालादेखील आरक्षण देण्याबाबतचा आदेश काढण्यात येणार आहे.
मराठा समाजाला शिक्षण आणि नोक:यांमध्ये 16 टक्के आरक्षण देण्याचा शासकीय आदेश सामाजिक न्याय विभागाने 15 जुलै रोजी काढण्यात आला होता. तोर्पयत अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये शैक्षणिक व सामाजिकदृटय़ा मागास प्रवर्गासाठी 16 टक्के आरक्षण निर्धारित करण्यात येत आहे, असा आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून येताच तंत्रशिक्षण संचालकांनी शुक्रवारी तसे परिपत्रक काढले. मात्र त्यात प्रथम वर्षाच्या प्रवेशाला हे आरक्षण लागू आहे का, याचा उल्लेख नाही.
मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याचा आदेश अल्पसंख्यांक विकास विभागाने आज काढला असून तो शासनाच्या संबंधित विभागांकडे पाठविला. त्यानुसार आता अभियांत्रिकी प्रवेशात मुस्लिमांना आरक्षण देण्यासंबंधीचे परिपत्रक तंत्रशिक्षण संचालक सोमवारी काढणार आहेत. अल्पसंख्यांक विभागाने सामाजिक न्याय विभागाप्रमाणो 15 जुलै रोजीच आदेश जारी केला असता, तर मराठा समाजाबरोबरच स् मुस्लिम समाजालाही प्रवेशात आरक्षण देण्याचे परिपत्रक तंत्रशिक्षण संचालकांना काढता आले असते. तथापि, मुस्लिम आरक्षणाचा आदेश चार दिवस उशिराने आज निघाला.
थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्याथ्र्याना 28 जुलैर्पयत अर्ज करता येणार आहे. अंतिम गुणवत्ता यादी 3 ऑगस्टला जाहीर होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
पत्र येताच अंमलबजावणी : मुस्लिम आरक्षणाबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आपल्याला पत्र येताच मुस्लिम आरक्षणाचीही अंमलबजावणी केली जाईल, असे तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक दयानंद मेश्रम यांनी सांगितले.