धनगर समाजाला आरक्षण अशक्य, मोदींचे पवारांना पत्र
By Admin | Updated: May 31, 2015 15:46 IST2015-05-31T15:46:26+5:302015-05-31T15:46:26+5:30
सद्यस्थितीत धनगर समाजाला आरक्षण देऊ शकत नाही असे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना पाठवल्याचा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

धनगर समाजाला आरक्षण अशक्य, मोदींचे पवारांना पत्र
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - सद्यस्थितीत धनगर समाजाला आरक्षण देऊ शकत नाही असे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना पाठवल्याचा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. भाजपा सरकारने धनगर समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने रविवारी मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी धनगर आरक्षणाविषयी मोदींच्या पत्राचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींनी सद्यस्थितीमुळे धनगर आरक्षण देणं अशक्य असल्याचे शरद पवार यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सुप्रिया सुळे यांच्या दाव्याने भाजपाने या मुद्द्यावरुनही यू टर्न घेतली की काय अशी शंका उपस्थित होत आहे. यावर भाजपाकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकलेली नाही.