शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

नाना पटोलेंविरोधात नाराजी?; काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 09:18 IST

प्रभारी एच. के. पाटील यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी राज्यातील पक्षाच्या संघटनात्मक बदलावर प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते.

विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरातही येथे सकाळी दाखल झाले होते. थोरात यांनी सकाळी एच. के. पाटील यांची भेट घेतली. एच. के. पाटील यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतल्यामुळे राज्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक बदलाचे संकेत मिळाले आहेत. राज्यातील डिजिटल सदस्यता मोहिमेचा आढावा तसेच संघटनात्मक बाबींवर सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाल्याचे समजते. एच. के. पाटील व सोनिया गांधी यांच्या भेटीच्यावेळी बाळासाहेब थोरात मात्र सोबत नव्हते. 

राज ठाकरे ‘ड्युप्लिकेट’ नेते : बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) राज ठाकरे राज्यातील ‘डुप्लिकेट’ नेते असून, ते भाजपचा अजेंडा राबवीत असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. ते पत्रकारांशी बोलत  होते. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी थोरात येथे आले आहेत.  थोरात म्हणाले, ‘राज ठाकरे यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते भूमिका  बदलतात. २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते मोदी सरकारवर टीका करीत होते. आता त्यांना महागाई, बेरोजगारीचे प्रश्न दिसत नाहीत. ठाकरे आता भोंगा व हनुमान चालिसावर बोलतात. ते आता भाजपशी संधान बांधून आहेत. भाजपचा अजेंडा ते महाराष्ट्रात राबविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भूमिका बदलणाऱ्या नेत्यांना किती गांभीर्याने घ्यायचे, असेही ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यात घेणे शक्य होणार नाही. परंतु, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाळण्यात येतील, असे थोरात म्हणाले. 

पटोलेंबद्दल नाराजी?महाराष्ट्रातील काही आमदारांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल नाराजी आहे. ही नाराजी काही आमदारांनी उघड केली आहे. या नाराजीबद्दल तसेच राज्यातील पक्षाच्या संघटनात्मक रचना अधिक बळकट करण्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले