नागोठणे : महामार्गावर वळण घेत असताना ट्रेलरच्या मागील चाकाखाली दुचाकी गेल्याने दुचाकीचा चक्काचूर झाला. मात्र, दुचाकीवरील दोन्ही विद्यार्थिनी बचावल्या. हा अपघात दुपारी मुंबई-गोवा महामार्गानजीकच्या रेल्वे फाटकाजवळ घडला. कोएसोच्या आनंदीबाई प्रधान महाविद्यालयाच्या श्रुती सावरगावकर (पाली), काजल विचारे (मोरेआळी, रोहे) या दोन विद्यार्थिनी स्कुटीसह रेल्वे फाटकानजीकच्या महामार्गाच्या फाट्यावर उभ्या राहिल्या. या वेळी पाठीमागून नागोठणे रेल्वे यार्डातून आलेल्या ट्रेलरने वळण घेत असताना स्कुटीला धडक देऊन आतमध्ये खेचले. स्कुटीसह त्यावर बसलेल्या या दोन्ही विद्यार्थिनीसुद्धा खेचल्या जात असताना नागोठणे ग्रामपंचायतीचा कर्मचारी निलेश पिंपळे यांच्या निदर्शनास आल्याने त्याने धावत जाऊन दोघींना मागे खेचल्याने त्या बचावल्या. ट्रेलरचालकाला नागोठणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत.
अपघातात विद्यार्थिनी बचावल्या
By admin | Updated: January 10, 2017 06:10 IST