आक्सा बीचवर बुडणा-या मुलांना जीवरक्षकांनी वाचवले
By Admin | Updated: June 5, 2016 14:41 IST2016-06-05T14:41:01+5:302016-06-05T14:41:01+5:30
आक्सा बीचवर भरतीच्यावेळेस बुडणा-या दोन मुलांना जीवरक्षकांनी वाचवले.

आक्सा बीचवर बुडणा-या मुलांना जीवरक्षकांनी वाचवले
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - आक्सा बीचवर भरतीच्यावेळेस बुडणा-या दोन मुलांना जीवरक्षकांनी वाचवले. फैयाज इकबाल शेख (१६) आणि अरबाज समिर शेख (१६) अशी दोघांची नावे आहेत. आक्सा बीच वरील भरतीच्या वेळेस दाना पाणी बीच वरुन आक्सा बीचवर येण्याकरीता नाला क्रॉस करताना दोन १६ वर्षीय मुले बुडत होती.
मुले बुडत असल्याचे लक्षात येताच सचिन मुळीक,नथुराम सुर्यवंशी, प्रितम कोळी या जीवरक्षकांनी तात्काळ धाव घेऊन त्यांना वाचवले. सदर घटनेच्या आगोदर त्या मुलांना तीन वेळा पाण्यात जाऊ नका असे सांगितले होते.
आज समुद्राला मोठी भरती होती. त्या भरतीच्या पाण्यात खेळण्याचा मोह मुलांना आवरला नाही. पाण्यात खेळताना मुले नाल्याल बुडु लागली. जीवरक्षकांनी सुखरुप बाहेर काढून त्यांना मालवणी पोलिसांच्या ताब्यात दिले.