रिसॉर्टच्या कर्मचा-यांची ‘लाय डिटेक्टर’ चाचणी
By Admin | Updated: February 26, 2015 05:59 IST2015-02-26T05:59:32+5:302015-02-26T05:59:32+5:30
लोणावळ्यातील कुमार रिसॉर्टमध्ये सातवर्षीय बालिकेवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी बेपत्ता झालेल्या संशयिताचा मित्र आणि हॉटेलच्या

रिसॉर्टच्या कर्मचा-यांची ‘लाय डिटेक्टर’ चाचणी
पुणे : लोणावळ्यातील कुमार रिसॉर्टमध्ये सातवर्षीय बालिकेवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी बेपत्ता झालेल्या संशयिताचा मित्र आणि हॉटेलच्या कर्मचाऱ्याची ‘लाय डिटेक्टर’ चाचणी घेण्याची परवानगी विशेष न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांनी बुधवारी दिली.
कुमार रिसॉर्टमध्ये १५ फेब्रुवारी रोजी एका लग्नसमारंभात सात वर्षीय मुलीवर बलात्कार करून खून झाल्याचा प्रकार घडला होता. पोलिसांनी बाललैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी लोणावळा पोलिसांनी रिसॉर्टमधील अजय शंकरराव दोदाडे (४२, रा. जि. वर्धा) याला ताब्यात घेतले आहे. त्याचा जबाब नोंदविताना त्याची ‘लाय डिटेक्टर’ चाचणी घेण्याबाबत लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर थोरात यांनी सोमवारी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. (प्रतिनिधी)