महेश भट्ट यांच्या पूर्वी २० कलाकारांना विनंती संदेश

By Admin | Updated: March 7, 2017 05:08 IST2017-03-07T05:08:10+5:302017-03-07T05:08:10+5:30

लखनऊमधून अटक करण्यात आलेल्या संदीप साहू (२४) याने बॉलीवूडमधील २० जणांना मदतीसाठी विनंतीचे संदेश पाठविले होते.

The request message to Mahesh Bhatt's earlier 20 artists | महेश भट्ट यांच्या पूर्वी २० कलाकारांना विनंती संदेश

महेश भट्ट यांच्या पूर्वी २० कलाकारांना विनंती संदेश


मुंबई : चित्रपट निर्माता - दिग्दर्शक महेश भट्ट यांना ठार मारण्याची धमकी देण्यापूर्वी लखनऊमधून अटक करण्यात आलेल्या संदीप साहू (२४) याने बॉलीवूडमधील २० जणांना मदतीसाठी विनंतीचे संदेश पाठविले होते. सातत्याने विनंती फेटाळल्याने त्याने धमकीचा मार्ग निवडल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
मूळचा लखनऊचा रहिवासी साहू हा व्यवसायात आलेल्या नुकसानीमुळे निराश झाला होता. अशात त्याने बॉलीवूडमधील वरुण धवन, राजपाल यादव, आयेशा श्रॉफ, सुनील ग्रोवर यांच्यासह २० जणांना विनंतीचे मेसेज दिले होते. ‘मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. मला तुमच्या मदतीची गरज आहे,’ असे त्यांना सांगितले. मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद न आल्याने विनंती करून काहीही हाती लागणार नसल्याचे त्याला समजले. म्हणून त्याने धमकीचा मार्ग निवडल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्याने हे मेसेज त्याच्याच मोबाइलवरून केले आहेत. तसेच गेल्या वर्षी तो कपिल शर्माच्या कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून गेला होता.
२६ फेब्रुवारी रोजी त्याने महेश भट्ट यांना धमकीचा मेसेज पाठवून ५० लाखांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास पत्नी आणि मुलीला जिवे मारण्याचा इशारा दिला. ‘आपल्या विरोधात ७० गंभीर गुन्हे दाखल असल्याचे त्याने म्हटले होते.

Web Title: The request message to Mahesh Bhatt's earlier 20 artists