गणेशोत्सवानिमित्त ट्विटरकडून गणरायाचे इमोजी

By Admin | Updated: September 5, 2016 10:37 IST2016-09-05T10:34:25+5:302016-09-05T10:37:08+5:30

गणेशभक्तांसाठी ट्विटर इंडियाने खास भेट दिली असून आठ इमोजी लॉन्च केले आहेत. विशेष म्हणजे मराठीमध्ये हॅशटॅगही देण्यात आले आहेत

Republic of Emoji for Ganeshotsav | गणेशोत्सवानिमित्त ट्विटरकडून गणरायाचे इमोजी

गणेशोत्सवानिमित्त ट्विटरकडून गणरायाचे इमोजी

- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - गणेशोत्सवानिमित्त गणेशभक्त सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देत असतात, आपल्या भावना व्यक्त करत असतात. अशा गणेशभक्तांसाठी ट्विटर इंडियाने खास भेट दिली असून आठ इमोजी लॉन्च केले आहेत. विशेष म्हणजे मराठीमध्ये हॅशटॅगही देण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशभक्त हॅशटॅग आणि इमोजी एकत्र ट्विट करु शकतील. ट्विटरने याआधी स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि दिवाळीतही स्पेशल इमोजी हॅशटॅग लॉन्च केले होते.
 
ट्विटर इंडियाने गणेशोत्सव हॅशटॅग आणि इमोजी लॉन्च केल्याने गणेशभक्ता खुश झाले आहेत. सोबतच याचा जास्तीत जास्त फायदाही घेतला जाणार आहे. नेहमी पोस्टर, बॅनरच्या माध्यमातून आपला प्रचार करणारी मंडळं आता थेट ट्विटरवरुन लोकांपर्यंत पोहोचू शकतात.
आजकाल प्रत्येकाकडेच मोबाईल आहे, आणि सोशल मिडियावरील प्रमाणही खूप आहे. त्यामुळे ट्विटरने उचललेलं हे पाऊल गणेशभक्तांसाठी वरदान ठरणार आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील गणेशोत्सवानिमित्त विशेष इमोजी तयार केल्याबद्दल ट्विटरचे आभार मानले आहेत.

Web Title: Republic of Emoji for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.