शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनी संविधान बचाव रॅली, राजू शेट्टी, जितेंद्र आव्हाड, राजीव सातव यांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 17:01 IST

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संविधान बचाव मार्च काढण्यात येणार आहे. विद्यापीठातील आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया येथे विनापक्ष विनाझेंडा आंदोलन करण्यात येणार आहे.

मुंबई- प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संविधान बचाव मार्च काढण्यात येणार आहे. विद्यापीठातील आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया येथे विनापक्ष विनाझेंडा आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यघटना वाचविण्यासाठी त्याची छेडछाड रोखण्यासाठी संविधान बचाव रॅली आम्ही काढणार आहोत, असं प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे.अनंतकुमार यांनी हे विधान सत्ताधारी असल्यानं केलं आहे, राज्यात सत्ता असली तरी तुम्हाला राज्य घटना बदलू देणार नाही. जनतेने सत्ता दिली ती विकासासाठी घटनाबदलासाठी नाही. विकासासाठी मते मागून घटनाबदलाचा कार्यक्रम राबविण चुकीचं आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले आहेत. राजू शेट्टी, जितेंद्र आव्हाड, राजीव सातव यांनी मुंबई पत्रकार संघात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.देशात विविध प्रवाह वगैरे असतानाही देश घटनेमुळेच एकत्र राहिला आहे. म्हणून आम्ही संविधान बचाव रॅली काढली आहे. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत संविधान वाचविण्यासाठी संघर्ष करणार असल्याचंही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे. आमची रॅली प्रतीकात्मक आहे. याला उत्तर म्हणून भाजपाने तिरंगा रॅली, संविधान सन्मान रॅली काढायची गरज नव्हती. पण ती काढतायत याचा अर्थ चोराच्या मनात चांदण, अशीही टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही टीका केली आहे. तरुणाईत सध्या अस्वस्थता आहे. विशेषतः विद्यापीठ कॅम्पसमध्ये अस्वस्थता आहे. घटनाबाह्य शक्तींच्या माध्यमातून घटना संपविण्याचे, बदलण्याचे प्रयत्न सुरू आहे. अनंतकुमार यांच्यासारख्या ज्येष्ठ खासदार मंत्री उघडपणे घटना बदलाची भाषा करत आहेत. तेव्हा संविधान बचावासाठी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. शरद पवार, शरद यादव, सीताराम येचुरी, सुशीलकुमार शिंदे, डी. राजा, तुषार गांधी, अल्पेश ठाकूर यांच्यासह अनेक सर्वपक्षीय नेते यात सहभागी होत आहेत.आमच्या रॅलीला उत्तर म्हणून तिरंगा रॅलीची भाजपाने घोषणा केली. पण, याच तिरंगा रॅलीला संघ-भाजपाने विरोध केला जोता. १४ ऑगस्ट १९४७ च्या ऑर्गनायझरच्या लेखात तिरंग्याला विरोध केला होता. ज्यांनी तिरंग्याला आपला मानला नाही ते आज तिरंगा सन्मान रॅली काढत आहेत. त्यामुळे आधी तुमच्या पूर्वजांच्या भूमिकेबद्दल माफी मागा. संविधानातच तिरंगा रक्षण आणि सन्मानाची तरतूद केली आहे. त्यामुळे आधी संविधान वाचलं तर तिरंगा आपोआप वाचेल. काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनीही भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री उद्या तिरंगा रॅली काढतायत. पण त्यांच्या लेटर हेडवर दीनदयाळ उपाध्याय यांचा फोटो असतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आधी भूमिका स्पष्ट करावी, असंही राजीव सातव म्हणाले आहेत.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीJitendra Awhadजितेंद्र आव्हाड