मंत्रालयात अहवाल लांबविणारे रॅकेट
By Admin | Updated: July 18, 2015 00:10 IST2015-07-18T00:10:31+5:302015-07-18T00:10:31+5:30
विविध चौकशी समित्यांचे अहवाल लांबणीवर टाकणारे रॅकेटच मंत्रालयात कार्यरत असल्याचा गौप्यस्फोट शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत केला.

मंत्रालयात अहवाल लांबविणारे रॅकेट
मुंबई : विविध चौकशी समित्यांचे अहवाल लांबणीवर टाकणारे रॅकेटच मंत्रालयात कार्यरत असल्याचा गौप्यस्फोट शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत केला.
प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान रामनाथ मोते यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागातील गैरप्रकारांबाबत प्रश्न उपस्थित केला. या वेळी चर्चेला उत्तर देताना तावडे म्हणाले की, केवळ शिक्षण खातेच नव्हे, तर मंत्रालयातील सर्वच विभागांत अहवाल लांबणीवर टाकणारे रॅकेट कार्यरत आहेत. विविध अनियमिततांची चौकशीसाठी समित्या नेमल्या जातात. मात्र, संबंधित दोषी अधिकारी सेवानिवृत्त होईपर्यंत चौकशी समित्यांचे अहवाल प्राप्त होत नाहीत. कारण अहवाल लांबविणारे रॅकेटच मंत्रालयात कार्यरत आहेत. अशी रॅकेट चालविणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करणार असल्याचे तावडे यांनी या वेळी सांगितले. तर, ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागातील गैरप्रकारांच्या चौकशी समितीच्या अहवालासंदर्भात अन्य विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाईल. येत्या २ महिन्यांत या प्रकरणी कारवाई करण्याची घोषणा त्यांनी केली.