नुकसानीचे पंचनामे न झाल्याची तक्रार असल्यास नोंदवा
By Admin | Updated: May 8, 2014 22:41 IST2014-05-08T19:45:26+5:302014-05-08T22:41:46+5:30
पुणे शेतीचे नुकसान होऊनही पंचनामे न झाल्याची तक्रार असल्यास शेतकर्यांनी ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या तक्रार रजिस्टरमध्ये तक्रार करावी

नुकसानीचे पंचनामे न झाल्याची तक्रार असल्यास नोंदवा
जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवाहन
पुणे शेतीचे नुकसान होऊनही पंचनामे न झाल्याची तक्रार असल्यास शेतकर्यांनी ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या तक्रार रजिस्टरमध्ये तक्रार करावी.या तक्रारींची वरिष्ठ महसूल अधिकार्यांकरवी चौकशी केली जाईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव यांनी आज पत्रकारांना सांगितली.
मध्यंतरी झालेल्या गारपीटीमुळे आणि अवकाळी पावसामुळे विविध तालुक्यांतील शेतकर्यांचे शेतीचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले होते.अनेक गावांमधून नुकसान होऊनही पंचनामे झाले नसल्याच्या तक्रारी आहेत.यापार्श्वभुमीवर जाधव यांना विचारले असता त्यांनी सांगितले की तहसीलदारांना याविषयी पहिल्यापासून सुचना देण्यात आल्या आहेत.गावपातळीवर पंचनामे झाले असतील तर मंडल अधिकारी, नायब तहसीलदार अशा अधिकार्यांनी पंचनाम्यांची तपासणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायतींमध्ये, चावड्यांवर, पंचायत समित्यांमध्ये तसेच तहसील कार्यालयाच्या काचफलकांवर लावण्यात आल्या आहेत.त्यामुळे कोणाचे नुकसान झाले आहे, याची माहिती सर्वांना माहिती होऊ शकते. ज्यांना नुकसानीविषयीच्या तक्रारी आहेत, त्यांनी तक्रार रजिस्टरमध्ये त्या नोंदविणे आवश्यक आहे.
दरम्यान, नुकसानग्रस्तांसाठी पहिल्या टप्प्यात १३कोटी४६लाख रूपयांची मदत आली होती.त्यापैकी १८हजार४०१शेतकर्यांना खात्यावर १३ कोटी४१लाख रूपयांचे वाटप झाले आहे, असे सांगून जाधव म्हणाले की दुसर्या टप्प्यात ४०कोटी१४लाख रूपयांची मदत प्राप्त झाली होती.४८हजार७८शेतकर्यांना या निधीचे वाटप केले गेले आहे.तिसर्या आणि अंतिम टप्प्यातील १८कोटी२६लाख४८हजार रूपयांचा निधी प्राप्त होणे अपेक्षित असून १३हजार११८शेतकर्यांना त्याचे वाटप केले जाणार आहे.