अवैध दारूची तक्रार करा व्हॉट्सअॅपवर!
By Admin | Updated: September 17, 2016 03:58 IST2016-09-17T03:58:38+5:302016-09-17T03:58:38+5:30
राज्यात अवैध दारू व्यवसाय तसेच अवैध दारू वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास तशी तक्रार आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून करता येईल. ८४२२००११३३ हा क्रमांक उपलब्ध करण्यात आला

अवैध दारूची तक्रार करा व्हॉट्सअॅपवर!
मुंबई : राज्यात अवैध दारू व्यवसाय तसेच अवैध दारू वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास तशी तक्रार आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून करता येईल. ८४२२००११३३ हा क्रमांक उपलब्ध करण्यात आला असून, तक्रार करणाऱ्याची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क आयुक्त व्ही. राधा यांनी सांगितले.
शहरात समाजकंटकांकडून अवैध दारू व्यवसाय होत असल्याची माहिती असूनही पोलीस विभागाकडे तक्रार करण्यास नागरिक धजावत नाहीत. त्यांना निर्भीडपणे तक्रार करता यावी, यासाठी व्हॉट्सअॅपवर तक्रार करण्याची सुविधा देण्यात आली आहे. या तक्रारीची दखल आयुक्त तसेच वरिष्ठ पातळीवरून घेण्यात येणार आहे.
नागरिकांनी या व्हॉट्सअॅप क्रमांकावर तक्रारी नोंदवाव्यात. तसे केल्यामुळे राज्यात अवैध दारू धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यात येईल, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.