शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी आमदारांच्या हाती दिले रिपोर्ट कार्ड; चार वर्षांतील कामगिरीचा आढावा

By यदू जोशी | Updated: October 10, 2018 03:40 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा आमदार खासदारांच्या बैठकीत आमदारांच्या चार वषार्तील कामगिरीचे रिपोर्ट कार्ड त्यांच्या हातात दिले आणि चार वर्षे आराम केला असेल तर आता उरलेल्या वर्षात जोमाने कामाला लागा अशा कानपिचक्याही दिल्या.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा आमदार खासदारांच्या बैठकीत आमदारांच्या चार वषार्तील कामगिरीचे रिपोर्ट कार्ड त्यांच्या हातात दिले आणि चार वर्षे आराम केला असेल तर आता उरलेल्या वर्षात जोमाने कामाला लागा अशा कानपिचक्याही दिल्या.भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात ही बैठक मंगळवारी सायंकाळी झाली. तीन तासांच्या बैठकीत सुरुवातीलाच प्रत्येक आमदाराच्या हातात दोन पाकिटे देण्यात आली. हिरव्या रंगाच्या पाकिटात राज्य सरकारच्या गेल्या चार वर्षातील कामगिरीचे तसेच विविध शासकीय योजनांची माहिती होती. दुसऱ्या खाकी पाकिटात काय आहे, याची उत्सुकता ताणली गेली. आमदारांनी ते उघडताच त्यातील अहवाल बघून अनेक जण जमिनीवर आले त्यात मंत्रिमंडळ विस्तारात आपली वर्णी लागण्याची अपेक्षा असलेल्या काही जणांचा देखील समावेश होता. त्यांचे चेहरे पडले तर काहींचे फुललेभाजपाच्या आमदारांबद्दल जनतेच्या भावना काय आहेत कोणत्या मतदारसंघात जनतेची पहिली पसंती आज कोणत्या पक्षाचा कोणता नेता आहे, कोणत्या मतदारसंघात आमदाराची लोकप्रियता कशी आणि किती आहे हे अहवालात नमूद होते. आजच्या परिस्थितीत मतदारसंघांमध्ये कोणकोणते समाज भाजपाच्या बाजूने आहेत, कोणते विरोधात जाऊ शकतात आमदारांबद्दल नेमकी नाराजी काय आहे आमदाराच्या कुठल्या कामांवर मतदार खुश आहेत, याचीही माहिती सर्वेक्षणात देण्यात आली आहे.‘प्रत्येक जणाने अहवाल नीट वाचावा. अजूनही वर्षभराचा काळ हाती आहे. प्रत्येकाने आपल्या परीने काम करण्याचा प्रयत्न केला असला तरी मोठा टप्पा गाठून आपल्याला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी जनतेसमोर जायचे आहे’,असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी मार्गदर्शन केले.खाजगी कंपनीकडून कामगिरीचे सर्वेक्षणएका खाजगी कंपनीकडून मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील १२२ भाजपा आमदारांच्या कामगिरीचे सर्वेक्षण करून घेतले आणि आज प्रत्येकाच्या हाती त्याबाबतचा अहवाल दिला. या अहवालात आपल्या मतदारसंघासंबंधी बारीक-सारीक तपशील तसेच जनतेचा कानोसा घेण्यात आला आहे हे वाचून आमदार आश्चर्यचकित झाले. प्रत्येक मतदारसंघातील पंचवीस ते तीस गावांमध्ये फिरून हे सर्वेक्षण करण्यात आले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र