भाजपाला योग्य वेळी उत्तर देऊ - उद्धव ठाकरे

By Admin | Updated: January 31, 2015 15:33 IST2015-01-31T15:33:25+5:302015-01-31T15:33:34+5:30

सामनातून केलेल्या टीकेचा वार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुल्लेखाने परतून लावला असतानाच 'त्यांना जे बोलायचंय ते बोलू दे,योग्य वेळ आल्यावर मी त्यावर उत्तर देईन' असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

Replying to the BJP at the right time - Uddhav Thackeray | भाजपाला योग्य वेळी उत्तर देऊ - उद्धव ठाकरे

भाजपाला योग्य वेळी उत्तर देऊ - उद्धव ठाकरे

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - शेतक-यांच्या आत्महत्येबाबत सामना या सेनेच्या मुखपत्रातून केलेल्या टीकेचा वार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुल्लेखाने परतून लावला असतानाच 'त्यांना जे बोलायचंय ते बोलू , योग्य वेळ आल्यावर मी त्यावर उत्तर देईन' असा इशारा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिला. 
मुख्यमंत्री व अर्थमंत्री दोघेही विदर्भाचे असतानाही, तेथील शेतक-यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत असा सवाल सामनातून विचारण्यात आला होता. त्यावर 'वर्तमानपत्रातून कोणी काही वक्तव्य केले म्हमजे अणुबॉम्ब उपटला असे नव्हे',  असे सूचक वक्तव्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी करत सेनेला टोला लगावला होता. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार व विनोद तावडेंनेही पलटवार केल्याने युतीतील धुसफूस वाढताना दिसत होती. त्याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना थेट उत्तर देणे उद्धव ठाकरे यांनी टाळले, मात्र योग्य वेळ आल्यावर आपण बोलूच, असा इशाराही त्यांनी दिला. 
 

Web Title: Replying to the BJP at the right time - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.