दीड लाख रिक्षा परवान्यांचे लवकरच नूतनीकरण
By Admin | Updated: October 3, 2015 03:41 IST2015-10-03T03:41:03+5:302015-10-03T03:41:03+5:30
राज्याच्या विविध शहरांमधील सुमारे दीड लाख आॅटोरिक्षांचे परवाने अनेक कारणांस्तव परिवहन विभागाने रद्द केले होते. आता या परवान्यांचे ३१ आॅक्टोबरपर्यंत

दीड लाख रिक्षा परवान्यांचे लवकरच नूतनीकरण
अकोला : राज्याच्या विविध शहरांमधील सुमारे दीड लाख आॅटोरिक्षांचे परवाने अनेक कारणांस्तव परिवहन विभागाने रद्द केले होते. आता या परवान्यांचे ३१ आॅक्टोबरपर्यंत नूतनीकरण करण्याचा निर्णय शासनाने शुक्रवारी घेतला.
राज्यात सद्य:स्थितीत ७ लाख २६ हजार आॅटोरिक्षा धावतात. तर, १ लाख ४0 हजार ६५ आॅटोरिक्षांचे परवाने परिवहन विभागाने रद्द केले आहेत. त्यांच्या नूतनीकरणाचा आग्रह आॅटोरिक्षा चालक संघटनांनी धरला होता. या पार्श्वभूमीवर या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. उशिरा योग्यता प्रमाणपत्र देणे, लागू केलेली सहमत शुल्काची अवाजवी रक्कम आॅटोरिक्षा परवानाधारक भरू न शकणे, यासह इतर कारणांमुळे परिवहन विभागाने राज्यातील विविध शहरांमधील १ लाख ४0 हजारांवर आॅटोरिक्षांचे परवाने रद्द केले होते. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात हजार-पंधराशे आॅटोरिक्षा विनापरवाना धावत आहेत.