शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

संशोधनामधील भाषेचा अडथळा दूर करणार

By admin | Updated: February 20, 2016 03:08 IST

जागतिक स्तरावर संशोधनात आपण खूपच मागे आहोत. याचे प्रमुख कारण भाषेचा अडथळा हे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर केवळ इंग्रजीमध्ये केलेले संशोधनच ग्राह्य धरण्यात येते

पुणे : जागतिक स्तरावर संशोधनात आपण खूपच मागे आहोत. याचे प्रमुख कारण भाषेचा अडथळा हे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर केवळ इंग्रजीमध्ये केलेले संशोधनच ग्राह्य धरण्यात येते आणि आपल्याकडे ग्रामीण आणि तळागाळातून आलेल्या हुशार मुलांना हा इंग्रजी भाषेचा अडथळा पार करता येत नाही. त्यामुळे आपण जागतिक स्तरावर संशोधनात पुढे जात नाही. हे चित्र बदलण्यासाठी आता भारतीय भाषांमध्ये संशोधन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी ‘इंडियन रँकिंग फ्रेमवर्क’ तयार करण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी दिली.इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, पुणे (आयसर) संस्थेस १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी आयसरचे संचालक प्रा. के.एन. गणेश, कुलसचिव कर्नल जी. राजशेखर, अधिष्ठाता जी. अंबिका, प्रा. श्याम राय व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर प्रेक्षकांमध्ये उपस्थित होते. या वेळी आयसरच्या नव्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. इराणी म्हणाल्या की, जागतिक संशोधनात आपण मागे असल्याबाबत शिक्षण तज्ज्ञांशी बोलत असताना असे समजले की, आपले संशोधक मागे पडण्यामागचे प्रमुख कारण भाषा आहे. मुलांशी बोलताना असे कळाले की, जी मुले ग्रामीण किंवा दुर्बल घटकातून आलेली असतात त्यांना जेव्हा शिक्षक इंग्रजीतून अभियांत्रिकी, गणिताचे शिक्षण देतात तेव्हा त्यांना पडलेले प्रश्न विचारण्यास ते धजावत नाहीत. आयआयटी गांधीनगरने एक ‘पिअर असिस्टर लर्निंग’ हा उपक्रम सुरू केला असून, यात शिक्षक मुलांना त्यांच्या भाषेतून समजावण्याचा प्रयत्न करतात. (प्रतिनिधी)