शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

मोबाईलमधून काढा घरबसल्या तिकीट

By admin | Updated: January 25, 2017 03:29 IST

जीपीएस प्रणालीत येणारा तांत्रिक अडथळ््यामुळे पेपरलेस मोबाईल तिकीट मिळवताना मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता.

मुंबई : जीपीएस प्रणालीत येणारा तांत्रिक अडथळ््यामुळे पेपरलेस मोबाईल तिकीट मिळवताना मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता. यातून सुटका करण्यासाठी रेल्वेच्या क्रिस (सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन) संस्थेकडून मोबाईल तिकीट सेवेत छापील प्रतचा पर्याय देण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांवर २५ जानेवारीपासून केली जात असल्याची माहिती देण्यात आली. यात एटीव्हीएममधून प्रवाशांना तिकीटाची छापील प्रत घेता येईल. महत्वाची बाब म्हणजे ही सेवा घेताना जीपीएस गरजेचे नसल्याने घरबसल्याही तिकीट प्रवाशांना काढता येईल आणि त्यानंतर स्थानकात जाऊन छापील प्रत घेता येईल. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते २0१५ च्या डिसेंबर महिन्यात मोबाईल तिकीट सेवा सुरु करताना ‘युटीएस आॅन मोबाईल’हे अ‍ॅप उपलब्ध केले गेले. सुरुवातीला ‘छापील प्रत’ची सुविधा होती. मात्र ही सेवा बंद करुन पेपरलेसचा पर्याय देण्यात आला. त्याचप्रमाणे युटीएस आॅन मोबाईल अ‍ॅपमधून तिकीट काढण्यासाठी रेल्वेच्या हद्दीपासून ३0 मीटर लांब जाण्याची आवश्यकता होती. तिकिटासाठी जीपीएसला सिग्नलच मिळत नसल्याने प्रवाशांचा तिकीट काढताना बराच वेळ जात होता. त्यामुळे क्रिसकडून छापील प्रतचा पर्यायच पेपरलेस मोबाईल तिकीट सेवेत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्मार्ट फोनवरुन तिकीट काढल्यावर मोबाईल आणि संकेतक्रमांक प्रवाशाला मिळेल. हा क्रमांक स्थानकातील एटीव्हीएम मशिनमध्ये टाकल्यावर तिकीटाची छापील प्रत घेता येईल. सर्व स्थानकात त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती क्रिसच्या मुंबई विभागाचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी दिली. या नवीन सेवेसाठी मोबाईलला फक्त नेटवर्क असल्यास तिकीट काढू शकता. त्यामुळे रेल्वेच्या हद्दीपासून ३0 मीटर अंतराची अट पेपरलेस सेवेशिवाय या दुसऱ्या पर्यायासाठी नसेल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)