संप चिघळण्यापूर्वी तोडगा काढा - तटकरे
By Admin | Updated: June 3, 2017 03:36 IST2017-06-03T03:36:47+5:302017-06-03T03:36:47+5:30
भाजपा सरकारच्या धोरणांमुळेच राज्यातील शेतकऱ्यांवर संपावर जाण्याची वेळ आली आहे. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शेतकरी

संप चिघळण्यापूर्वी तोडगा काढा - तटकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजपा सरकारच्या धोरणांमुळेच राज्यातील शेतकऱ्यांवर संपावर जाण्याची वेळ आली आहे. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शेतकरी संपावर गेले असून, त्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. हा संप आणखी चिघळण्याची वाट न पाहता, सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार सुनील तटकरे यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या संपास राष्ट्रवादीचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगतानाच तटकरे म्हणाले की, ‘आंदोलनादरम्यान दूध, फळे, भाजीपाला यांची नासाडी न करता, शेतकऱ्यांनी अहिंसक व शांततेच्या मार्गाने आंदोलन पुढे न्यावे. विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने विधिमंडळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सातत्याने आवाज उठवला आहे, परंतु सरकारने मागील अधिवेशनात आमच्या आमदारांचे निलबंन करून मुस्कटदाबी केली़द त्यामुळे ही लढाई संघर्षयात्रेतून जनतेच्या दरबारात लढली.’