इंदू मिल स्मारकाचे अडथळे दूर होणार
By Admin | Updated: December 17, 2014 23:41 IST2014-12-17T23:41:27+5:302014-12-17T23:41:27+5:30
दादरमधील चैत्यभूमीजवळच्या इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी लागणा-या सर्व परवानग्यांची मंजुरी अंतिम टप्प्यात

इंदू मिल स्मारकाचे अडथळे दूर होणार
नागपूर : दादरमधील चैत्यभूमीजवळच्या इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी लागणा-या सर्व परवानग्यांची मंजुरी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती राज्याचे महसूलमत्री एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावर गेले दोन दिवस सुरू असलेल्या चर्चेस खडसे यांनी बुधवारी विधानपरिषदेत उत्तर दिले.
राज्य सरकारने केंद्राकडे यासंदर्भात निरनिराळ््या परवानग्यांसाठी प्रस्ताव पाठविले होते. केंद्रीय वस्त्रोद्योग व पर्यावरण मंत्रालयाकडून मिळणाऱ्या परवानग्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. यासंबंधी निर्णय घेताना ते निर्दोष हवेत यासाठी ही धडपड सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.