रिमोट मागितल्याच्या रागातून पत्नीचा खून

By Admin | Updated: June 17, 2017 00:38 IST2017-06-17T00:38:50+5:302017-06-17T00:38:50+5:30

पत्नीने रिमोट मागितल्याचा राग आल्याने पतीने तीन मुलींसमोरच पत्नीच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी अंबड येथील दत्तनगर

Remembrance of a wife asks for a wife's blood | रिमोट मागितल्याच्या रागातून पत्नीचा खून

रिमोट मागितल्याच्या रागातून पत्नीचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पत्नीने रिमोट मागितल्याचा राग आल्याने पतीने तीन मुलींसमोरच पत्नीच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी अंबड येथील दत्तनगर भागात उघडकीस आली. खून केल्यानंतर पतीने पलायन केले असून, अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांडुरंग लक्ष्मण मानवतकर हे पत्नी शोभा व तीन मुलींसह येथे राहतात. ते एका खासगी बिल्डरकडे मोलमजुरीचे काम करतात. ते मूळचे वाढोबा (ता. शेणगाव, जि. हिंगोली) येथील रहिवासी आहेत. गुरुवारी रात्री कामावरून घरी आल्यानंतर ते टीव्ही पाहत बसले होते. शोभा यांनी रिमोट मागितला. त्याचा राग आल्याने पांडूरंग यांनी रिमोट फेकून दिला व ते घरातून जेवण न करताच निघून गेले. मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास ते पुन्हा घरी आले. त्यांच्यात पुन्हा किरकोळ वाद झाला. त्यानंतर पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास पांडूरंग याने झोपेतच पत्नीचे उशीने तोंड दाबून तिच्या डोक्यात दगड टाकून खून केला.
अंध मुलीनेच दिली पोलिसांना साक्ष
संशयित पांडुरंग यास तीन मुली असून, दहा वर्षांची मुलगी कोमल ही अंध आहे. आई-वडील भांडण होत असल्याने ती जागीच होती. पहाटेच्या सुमारास वडिलांनी आईच्या डोक्यात दगड टाकून तिचा खून केल्याची माहिती कोमलनेच पोलिसांनी दिली.

Web Title: Remembrance of a wife asks for a wife's blood