शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

कोरोनाला धर्म चिकटवणं निव्वळ अशास्त्रीय : डॉ. गणेशदेवी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 16:45 IST

दिल्लीच्या मरकज मधील एका घटनेचे निमित्त करून कोरोनाला धर्म चिकटवण्याचा जो अश्लाघ्य प्रयत्न झाला तो वेदनादायक आणि क्लेशकारक आहे.

ठळक मुद्देविखारी प्रचार थांबवण्यासाठी देशाचे संविधानिक प्रमुख या नात्याने आपण पुढाकार घेणं आवश्यकसोशल डिस्टन्सिंगच्या ऐवजी 'फिजिकल डिस्टन्सिंग'हा शब्द अधिक संयुक्तिक शब्द

पुणे : कोरोनाच्या प्रसाराला कोणत्याच जाती, धर्म, प्रांत, भाषा आणि देशाचे बंधन राहिलेले नाही. या सर्व सीमा ओलांडून जग कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. त्यामुळे दिल्लीच्या मरकज मधील एका घटनेचे निमित्त करून कोरोनाला धर्म चिकटवण्याचा जो अश्लाघ्य प्रयत्न झाला तो वेदनादायक आणि क्लेशकारक आहे. अडकले आहे. त्यामुळे कोरोनाला धर्म चिकटवणं हे निव्वळ अशास्त्रीयच आहे. तरीही राळ उठवण्यात आली. त्यामागे काही अजेंडा आहे? याची भीती या देशावर आणि देशवासियांवर प्रेम करणाऱ्यांना वाटत आहे.ज्या पद्धतीने या बातम्यांचा प्रसार केला गेला आणि त्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून जो विखारी प्रचार करण्यात आला.  तो थांबवण्यासाठी या देशाचे संविधानिक प्रमुख या नात्याने आपण पुढाकार घेणं आवश्यक आहे, अशा स्वरूपाचे पत्र ज्येष्ठ भाषातज्ञ आणिराष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.  दिल्लीत एका मणिपुरी मुलीवर तिला चिनी म्हणून चिडवून एक व्यक्ती थुंकला. हाही प्रकार अत्यंत घातक आणि घृणास्पद होता. थुंकणारा कुणी मरकजवाला नव्हता. याकडे डॉ. गणेश देवी यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.सध्याच्या टाळेबंदीच्या काळात सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) ची नव्हे तर सोशल कनेक्शन ची अधिक गरज आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या ऐवजी 'फिजिकल डिस्टन्सिंग'हा शब्द अधिक संयुक्तिक शब्द  आहे. कारण 'सोशल डिस्टन्सिंग' हा शब्द भारतात दोन हजार वर्षांपासून रूढ आहे.जातीप्रथेच्या नावाखाली अस्पृश्यता म्हणजे विशिष्ट समाजापासून अंतर राखणंअसा यामागचा अर्थ अभिप्रेत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सोशल डिस्टन्सिंग शब्दाला कायमचीच मूठमाती दिली आहे. जगभरातील अनेक समाजशास्त्रज्ञांनी या शब्दाला आक्षेप घेतल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने देखील आता या शब्दाऐवजी 'सोशल कनेक्टनेस विथ फिजिकल डिस्टन्स' असा शब्दप्रयोग केला आहे. त्यामुळे  'सोशल डिस्टन्सिंग' हा शब्दप्रयोग टाळावा, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. दुष्काळ व अतिवृष्टीमुळे जितकं नुकसान झालं नसेल तितक कोरोना महामारीमुळे भारतीय शेती व्यवस्थेचं झालं आहे. शेतकरी उद्धवस्त झाला आहे. त्यांना मदत करणे ग्रजेचे आहे. आजसगळे उद्योगधंदे बंद झाल्याने रोजी रोटीची कोणतीच साधन उपलब्ध नाहीत.हातावर पोट असलेल्या लोकांना वा-यावर सोडणे बोवाबदारपणाचे ठरेल.त्यांच्या किमान दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था शासनाने तातडीने करण्याची गरज आहे. तसेच यापुढील काळात आरोग्य आणि शिक्षणात सर्वाधिक खर्च करणे त्याबरोबरच या क्षेत्रांमध्ये खासगीकरणाला नकार देण हाच उत्तम उपाय असल्याचे पत्रात सूचित करण्यात आले आहे.------------------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या