कोरोनाला धर्म चिकटवणं निव्वळ अशास्त्रीय : डॉ. गणेशदेवी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 04:26 PM2020-04-20T16:26:34+5:302020-04-20T16:45:49+5:30

दिल्लीच्या मरकज मधील एका घटनेचे निमित्त करून कोरोनाला धर्म चिकटवण्याचा जो अश्लाघ्य प्रयत्न झाला तो वेदनादायक आणि क्लेशकारक आहे.

The Religious join to Corona is wrong : Dr. Ganesh Devi's letter to Prime Minister Narendra Modi | कोरोनाला धर्म चिकटवणं निव्वळ अशास्त्रीय : डॉ. गणेशदेवी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

कोरोनाला धर्म चिकटवणं निव्वळ अशास्त्रीय : डॉ. गणेशदेवी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

googlenewsNext
ठळक मुद्देविखारी प्रचार थांबवण्यासाठी देशाचे संविधानिक प्रमुख या नात्याने आपण पुढाकार घेणं आवश्यकसोशल डिस्टन्सिंगच्या ऐवजी 'फिजिकल डिस्टन्सिंग'हा शब्द अधिक संयुक्तिक शब्द

पुणे : कोरोनाच्या प्रसाराला कोणत्याच जाती, धर्म, प्रांत, भाषा आणि देशाचे बंधन राहिलेले नाही. या सर्व सीमा ओलांडून जग कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. त्यामुळे दिल्लीच्या मरकज मधील एका घटनेचे निमित्त करून कोरोनाला धर्म चिकटवण्याचा जो अश्लाघ्य प्रयत्न झाला तो वेदनादायक आणि क्लेशकारक आहे. अडकले आहे. त्यामुळे कोरोनाला धर्म चिकटवणं हे निव्वळ अशास्त्रीयच आहे. तरीही राळ उठवण्यात आली. त्यामागे काही अजेंडा आहे? याची भीती या देशावर आणि देशवासियांवर प्रेम करणाऱ्यांना वाटत आहे.ज्या पद्धतीने या बातम्यांचा प्रसार केला गेला आणि त्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून जो विखारी प्रचार करण्यात आला.  तो थांबवण्यासाठी या देशाचे संविधानिक प्रमुख या नात्याने आपण पुढाकार घेणं आवश्यक आहे, अशा स्वरूपाचे पत्र ज्येष्ठ भाषातज्ञ आणिराष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.
  दिल्लीत एका मणिपुरी मुलीवर तिला चिनी म्हणून चिडवून एक व्यक्ती थुंकला. हाही प्रकार अत्यंत घातक आणि घृणास्पद होता. थुंकणारा कुणी मरकजवाला नव्हता. याकडे डॉ. गणेश देवी यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.सध्याच्या टाळेबंदीच्या काळात सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) ची नव्हे तर सोशल कनेक्शन ची अधिक गरज आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या ऐवजी 'फिजिकल डिस्टन्सिंग'हा शब्द अधिक संयुक्तिक शब्द  आहे. कारण 'सोशल डिस्टन्सिंग' हा शब्द भारतात दोन हजार वर्षांपासून रूढ आहे.जातीप्रथेच्या नावाखाली अस्पृश्यता म्हणजे विशिष्ट समाजापासून अंतर राखणंअसा यामागचा अर्थ अभिप्रेत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सोशल डिस्टन्सिंग शब्दाला कायमचीच मूठमाती दिली आहे. जगभरातील अनेक समाजशास्त्रज्ञांनी या शब्दाला आक्षेप घेतल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने देखील आता या शब्दाऐवजी 'सोशल कनेक्टनेस विथ फिजिकल डिस्टन्स' असा शब्दप्रयोग केला आहे. त्यामुळे  'सोशल डिस्टन्सिंग' हा शब्दप्रयोग टाळावा, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. दुष्काळ व अतिवृष्टीमुळे जितकं नुकसान झालं नसेल तितक कोरोना महामारीमुळे भारतीय शेती व्यवस्थेचं झालं आहे. शेतकरी उद्धवस्त झाला आहे. त्यांना मदत करणे ग्रजेचे आहे. आजसगळे उद्योगधंदे बंद झाल्याने रोजी रोटीची कोणतीच साधन उपलब्ध नाहीत.हातावर पोट असलेल्या लोकांना वा-यावर सोडणे बोवाबदारपणाचे ठरेल.त्यांच्या किमान दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था शासनाने तातडीने करण्याची गरज आहे. तसेच यापुढील काळात आरोग्य आणि शिक्षणात सर्वाधिक खर्च करणे त्याबरोबरच या क्षेत्रांमध्ये खासगीकरणाला नकार देण हाच उत्तम उपाय असल्याचे पत्रात सूचित करण्यात आले आहे.
------------------------------------------------------------------------------------------------

Web Title: The Religious join to Corona is wrong : Dr. Ganesh Devi's letter to Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.