संसदेपेक्षा धर्मसंसद मोठी नाही
By Admin | Updated: September 17, 2014 03:20 IST2014-09-17T03:20:08+5:302014-09-17T03:20:08+5:30
मोदी सरकार आल्यापासून धार्मिक शक्ती उफाळून येऊ पाहत आहेत. साईबाबा कुणाच्या पोटी जन्माला आले हा वाद धर्मसंसदेतूननिर्माण केला जात आहे.

संसदेपेक्षा धर्मसंसद मोठी नाही
शरद पवारांनी फुंकले प्रचाराचे रणशिंग : महाराष्ट्रच सांप्रदायिक विचारधारा उद्ध्वस्त करेल
कोल्हापूर : मोदी सरकार आल्यापासून धार्मिक शक्ती उफाळून येऊ पाहत आहेत. साईबाबा कुणाच्या पोटी जन्माला आले हा वाद धर्मसंसदेतूननिर्माण केला जात आहे. याच धर्मसंसदेने कधी काळी शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्र्वर, तुकाराम यांना वेगळी वागणूक दिली होती. या देशाला फक्त एकच संसद माहित आहे व ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने अस्तित्वात आली आहे. धर्माच्या नावाने चालणारी संसद कुणी मजबूत करत असेल तर अशी सांप्रदायिक विचारधारा उद्ध्वस्त केल्याशिवाय हा महाराष्ट्र राहणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी येथे झालेल्या विराट प्रचार प्रारंभ सभेत व्यक्त केला़
राष्ट्रवादी काँग्रेसने आज कोल्हपुरातून प्रचाराचे रणशिंग फुंकले. या निमित्ताने प्रभाव क्षेत्र असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीने ताकद दाखवून दिली. सभेसाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे होते. या सभेत पवार यांनी पंधरा मिनिटांच्या भाषणात राष्ट्रवादीचा निवडणूक जाहीरनामाच मांडला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद मोदी यांची लोकसभा निवडणुकीतील लाट शंभर दिवसांत ओसरली असून, महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीत आमच्याच पक्षाची लाट आहे. ‘राष्ट्रवादी’च्या हातात सत्ता द्या, देशात नावलौकिक होईल, असा कारभार करून दाखवू, अशी ग्वाही पवार यांनी दिली़
यावेळी तटकरे, गृहमंत्री आर. आर. पाटील, बांधकाम मंत्री छगन भुजबळ आदी नेत्यांची भाषणो झाली.(प्रतिनिधी)
आता माझी सटकली - अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाचे नेते विनोद तावडे यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, हा पठ्ठय़ा गेल्या काही दिवसांपासून काहीही बरळत आहे. हा कधीही विधानसभेवर निवडून आला नाही. मग लोकांचे प्रश्न काय मांडणार? आर.आर. पाटलांचे भाषण ऐकल्यानंतर, आता माझी सटकली, मला राग येतोय. मला राग.! अशा शब्दांत अजित पवारांनी आपल्या भावना मांडल्या.
राष्ट्रवादीचा जाहीरनामा
च्65 वर्षावरील शेतकरी, शेतमजूर व कोरडवाहू शेतक:यांना पेन्शन देणार
च्राज्यातील 6क् टक्के शेती ठिबकखाली आणणार
च्ठिबक सिंचनासाठी 75 टक्के अनुदान देणार
च्शेतक:यांना लागेल तेवढी वीज
च्सर्वासाठी आरोग्य विमा लागू करणार
च्इतर मागासवर्गीय समाजासाठी मंत्रलयात स्वतंत्र विभाग
च्अल्पसंख्याक समाजाच्या मौलाना आझाद महामंडळासाठी 2 हजार कोटी