शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कच्च्या कैद्यांना दिलासा अन् तुरुंगांवरील भारही होणार कमी

By यदू जोशी | Updated: September 2, 2018 02:15 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेलोशिप प्रोग्राममधील तरुण-तरुणी विविध लोकाभिमुख योजना/उपक्रमांवर चांगले काम करीत असून आता एक आगळावेगळा मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम आॅक्टोबरपासून सुरू होत आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेलोशिप प्रोग्राममधील तरुण-तरुणी विविध लोकाभिमुख योजना/उपक्रमांवर चांगले काम करीत असून आता एक आगळावेगळा मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. राज्यातील विविध तुरुंगांमध्ये खितपत असलेल्या कच्च्या कैद्यांना जामीन मिळवून देत तुरुंगावरील भार कमी करणे हा त्याचा उद्देश असेल.बहुतेक कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट वा त्यापेक्षा जास्त कैदी आहेत. त्यातील २५ टक्के कैदी हे शिक्षा भोगत असून तब्बल ७५ टक्के कैदी हेकच्चे आहेत. म्हणजे त्यांचा गुन्हासिद्ध झालेला नाही, पण त्यांना कोणत्याही कारणाने जामीन मिळू शकलेला नाही.‘बेल अ‍ॅण्ड नॉट जेल’ असेस्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच दिलेले आहेत. खटल्याचा निकाल लागेपर्यंत आरोपी हा निर्दोष आहे. त्याला जामीन द्या, कारागृहात टाकू नका, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करूनही कच्च्या कैद्यांनी तुरुंगात पडून राहण्याचे प्रमाण कमी होऊ शकलेले नाही.खटल्याचा निकाल लागत नाही तोवर त्यांना तुरुंगात राहण्याची वेळ येऊ नये, या उद्देशानेच मुख्यमंत्री फेलोशिप सुरू होणार आहे. त्यात तरुण वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांना सामावून घेतले जाईल. प्रशिक्षणानंतर ते प्रत्यक्ष काम सुरू करतील. कारागृह प्रशासनाच्या परवानगीने हे फेलो सरकारी वकिलांसोबत जाऊन कैद्यांना भेटतील. त्यांना जामीन मिळावा यासाठीची पार्श्वभूमी तयार करतील आणि जामीन मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सर्व वैधानिक प्रयत्न करतील.अर्थात त्यासाठी गुन्ह्याचे स्वरूपही लक्षात घेतले जाईल. मुंबई उच्च न्यायालय, राज्य विधि सेवा प्राधिकरण आणि कारागृह प्रशासन यांच्यात या प्रोग्रामसाठी सामंजस्य करार झाला आहे.कोटींची मदतकच्च्या कैद्यांना तुरुंगातून बाहेर येऊन मोकळा श्वास घेता यावा यासाठीच्या संपूर्ण उपक्रमाला प्रख्यात उद्योगपती अझीम प्रेमजी यांच्या फाउंडेशनने ७५ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य राज्य सरकारला केले आहे.प्रमुख तुरुंगांमधील कैदी क्षमता अन् प्रत्यक्ष संख्या अशीयेरवडा 2449/5403कोल्हापूर 1789/1873मुंबई 804/2776ठाणे 1105/3156औरंगाबाद 579/1111नाशिक रोड 3178/3509नागपूर 1840/2308अमरावती 973/1064तळोजा 2124/2642एकूण 14841/23842

टॅग्स :jailतुरुंगMaharashtraमहाराष्ट्र