शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना दिलासा, होमिओपॅथी डॉक्टर ‘एमएमसी’मध्ये नोंद करू शकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 12:05 IST

‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: होमिओपॅथी शाखेतील ज्या डॉक्टरांनी सीसीएमपी (सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी) हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांची नोंद महाराष्ट्र वैद्यकीय परिषद ( एमएमसी) या ठिकाणी स्वतंत्र नोंद वही करून ठेवण्याच्या निर्णयास इंडियन मेडिकल असोसिएशन विरोध केला होता. त्यामुळे होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी थांबविण्यात आली होती. मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाने शुक्रवारी निर्णय घेऊन अशी नोंद करण्यास हरकत नसल्याचे पत्रक एमएमसीला काढून ही नोंद करावी, असे सांगण्यात आले.

काही महिन्यांपूर्वी होमिओपॅथी विरुद्ध ॲलोपॅथी असा संघर्ष राज्यात दिसला होता. होमिओपॅथी डॉक्टरांची नोंद ॲलोपॅथीच्या परिषदेत होऊ नये यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने राज्यभर विरोध केला होता. त्यानंतर ही नोंद थांबविण्यात आली होती. विशेष म्हणजे हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. सीसीएमपी हा अभ्यासक्रम म्हणजे ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठीचा एक सकारात्मक आणि आवश्यक पुढाकार असून, त्याला विरोध नव्हे तर पाठबळ द्यावे, अशी भूमिका होमिओपॅथी कौन्सिलने घेतली होती.

होमिओपॅथी परिषदेकडून स्वागत याप्रकरणी, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे प्रशासक डॉ. बाहुबली शहा यांनी सांगितले की, सत्याचा नेहमी विजय होतो. हे आजच्या शासनाच्या निर्णयावरून दिसून आले आहे. आमचा हक्क जो हिरावून घेतला होता तो आम्हाला पुन्हा बहाल झाला आहे. याचा आम्हाला आनंद याचे आम्ही स्वागत करतो. तर इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. त्या सांगितले, हा निर्णय चुकीचा आहे. हे प्रकरण न्यायप्रविशष्ट आहे. आम्ही आमची बाजू उच्च न्यायालयात मांडू.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रdoctorडॉक्टर