शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुंबईकरांना दिलासा, यंदाही मालमत्ता करवाढ नाही; मंत्रिमंडळ बैठकीत २० महत्त्वाचे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 15:22 IST

मध उद्योगाला बळकटी देण्यासाठी मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवणार असल्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.

मुंबई - शहराच्या दृष्टीने नागरिकांचे लक्ष लागलेल्या करवाढीबाबत महापालिकेच्या प्रस्तावाला अखेर नगरविकास खात्याने मंजुरी दिली आहे. मुंबईत यावर्षीसुद्धा मालमत्ता कर वाढ नाही असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचसोबत उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. 

मंत्रिमंडळाचे २० महत्त्वाचे निर्णय कोणते? वाचा 

  1. मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही (नगरविकास विभाग) 
  2. राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार. 2 लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणार.(कौशल्य विकास विभाग)
  3. ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षावरील नागरिकांना लाभ देणार (सामाजिक न्याय विभाग)
  4. राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान महाभियान राबवणार. पायाभूत सुविधा बळकट करणार (नगर विकास विभाग)
  5. उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणार (वन विभाग )
  6. मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवणार. मध उद्योगाला बळकटी  (उद्योग विभाग)
  7. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी (वन विभाग)
  8. बंजारा, लमाण समाजाच्या तांड्यांचा विकास करणार. मूलभूत सुविधा देणार (ग्राम विकास विभाग)
  9. शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार, नवीन इमारत उभारणी (सामान्य प्रशासन विभाग)
  10. धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार (गृहनिर्माण विभाग)
  11. सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते (विधि व न्याय विभाग)
  12. स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास सुधारित मान्यता (जलसंपदा विभाग)
  13. बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य. पतसंस्थांना मजबूत करणार (सहकार विभाग)
  14. कोंढाणे लघु प्रकलपाच्या कामास जादा खर्चास मान्यता (जलसंपदा विभाग)
  15. तिवसे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार (जलसंपदा विभाग)
  16. नांदेडच्या गुरुद्धारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्धारा अधिनियम (महसूल विभाग)
  17. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार (सामान्य प्रशासन विभाग)
  18. कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्ष (कृषी विभाग)
  19. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामचे नवीन मंडळ कार्यालय (सार्वजनिक बांधकाम विभाग)
  20. गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशुसंवर्धन पद (पशुसंवर्धन विभाग)
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMumbaiमुंबईFarmerशेतकरी