Dhananjay Munde vs Karuna Munde: माजी मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला. विधानसभा निवडणूक २०२४ मधील त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रामध्ये उल्लेख केलेल्या माहितीवर आक्षेप घेण्यात आला होता. लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परळी वैद्यनाथ यांच्या न्यायालयात करुणा शर्मा-मुंडे यांनी फौजदारी कारवाई करण्याबाबत फिर्याद प्रकरण दाखल केले होते. याबाबत आज परळी न्यायालयाने निकाल दिला असून या प्रकरणातील सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे सांगत फेटाळून लावले.
धनंजय मुंडे यांच्या नामनिर्देशन पत्रामध्ये नमूद माहितीवरून करुणा मुंडे यांनी वेगवेगळे आरोप करत शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत लोकप्रतिनिधी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी परळीच्या प्रथमवर्ग न्यायालयात सुनावणी पार पडली. करुणा मुंडे यांनी नोंदवलेला जबाब, वकिलांचा युक्तिवाद यांसह वस्तुस्थिती लक्षात घेत न्यायालयाने करुणा मुंडे यांनी दाखल केलेली फिर्याद फेटाळून लावली आहे. धनंजय मुंडे यांच्यावतीने ॲड. अशोक कवडे यांच्यासह ॲड. हरिभाऊ गुट्टे यांनी काम पाहिले.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या बाजूने न्यायालयाने आणखी एक निकाल दिला आहे. याआधी देखील कृषी विभागाच्या खरेदी वरून निरनिराळे आरोप करत धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये देखील कोणतेही तथ्य आढळले नाही आणि ते प्रकरण देखील मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावत तक्रारदाराला उलट दंड लावला होता.
नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी परळीत एकहाती सत्ता कायम राखली, तेव्हा देखील न्यायालयाच्या निकालात आणि जनतेच्या निकालात आपला विजय झाल्याची भावनिक प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली होती.
Web Summary : Dhananjay Munde received relief as the court dismissed Karuna Munde's petition alleging false information in his election affidavit. The court found the allegations baseless. Previously, the Bombay High Court also dismissed a petition against Munde, imposing a fine on the complainant. Munde retained power in Parli's recent municipal elections.
Web Summary : धनंजय मुंडे को राहत मिली क्योंकि अदालत ने करुणा मुंडे की याचिका को खारिज कर दिया, जिसमें उनके चुनाव हलफनामे में झूठी जानकारी का आरोप लगाया गया था। अदालत ने आरोपों को निराधार पाया। इससे पहले, बॉम्बे हाईकोर्ट ने भी मुंडे के खिलाफ एक याचिका खारिज कर दी थी, और शिकायतकर्ता पर जुर्माना लगाया था। मुंडे ने परली के हालिया नगर पालिका चुनावों में सत्ता बरकरार रखी।