कुंटणखान्यातून महिलांची सुटका
By Admin | Updated: December 22, 2016 04:02 IST2016-12-22T04:02:21+5:302016-12-22T04:02:21+5:30
मुंब्रा-पनवेल रोडवरील डायघर परिसरातील एका लॉजमध्ये शरीरविक्रयासाठी आणलेल्या दोन महिलांची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या

कुंटणखान्यातून महिलांची सुटका
ठाणे : मुंब्रा-पनवेल रोडवरील डायघर परिसरातील एका लॉजमध्ये शरीरविक्रयासाठी आणलेल्या दोन महिलांची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने सुटका केली आहे. या प्रकरणी लॉजचा मालक अखिलेश उर्फ अजय सिंग (२६) याच्यासह चौघांना अटक केली असून त्यांना २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
व्यवस्थापक मंगेश जाधव (२५, दहिसर, ठाणे), वेटर तथा दलाल संजय प्रधान (२४, रा. कोनगाव, कल्याण) आणि कॅशियर तथा दलाल अनिल यादव (रा. दहिसर मोरी, ठाणे) अशी या प्रकरणी अटक केलेल्या उर्वरित तिघांची नावे आहेत.. डायघर पोलीस याबाबतचा पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)