अभिनेता नवाजुद्दीन आणि त्या महिलेच्या भांडणाचा व्हिडीओ रिलीज

By Admin | Updated: January 20, 2016 19:08 IST2016-01-20T19:01:23+5:302016-01-20T19:08:58+5:30

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकीवर आरोप करणाऱ्या महिलेने त्या दिवसाचं मोबाईल व्हिडीओ समोर आल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने पार्किंगच्या

Release of the video of actor Nawazuddin and the woman's quarrel | अभिनेता नवाजुद्दीन आणि त्या महिलेच्या भांडणाचा व्हिडीओ रिलीज

अभिनेता नवाजुद्दीन आणि त्या महिलेच्या भांडणाचा व्हिडीओ रिलीज

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि.२० - अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकीवर आरोप करणाऱ्या महिलेने त्या दिवसाचा मोबाईल व्हिडीओ रिलीज केला आहे. 
त्या महिलेने नवाजुद्दीवर विनयभंग आणि धक्काबुकी केल्याचा आरोप केला आहे. मात्र, त्या व्हिडीओमध्ये तसे काही दिसून येत नाही. मात्र त्या दिवशी नेमकं काय घडले ते दिसून येत आहे. 
हा व्हिडीओ एबीपी माझावर रिलीज झाला असून त्यामध्ये नवाजुद्दीन आणि त्या महिलेमध्ये बाचाबाची झाल्याचे दिसते आहे. नवाजुद्दीन सुरक्षारक्षकांसोबत घरातून बाहेर येतो आणि व्हिडीओ शूटिंग बंद करायला सांगतो. दरम्यान, महिला जाण्याच्या तयारी असते, त्याचवेळी नवाजुद्दीन काहीतरी बोलतो आणि महिला पुन्हा भांडायला सुरुवात करते.  हे भांडण पार्किंगवरुन सुरु झाल्याचं लक्षात येतं. मात्र, नवाजुद्दीनने महिलेला धक्का दिला, हे या व्हिडीओतून तरी स्पष्ट होत नसल्याचे दिसून येते. 
नवाजुद्दीन सिद्दीकी याने पार्किंगच्या वादातून महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार वर्सोवा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी नवाजुद्दीनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरीतील झोहरा आघाडीनगर जेएनके सोसायटीमध्ये गेल्या रविवारी दुपारी ही घटना घडली. 

Web Title: Release of the video of actor Nawazuddin and the woman's quarrel