लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने साकारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘वृत्तपत्र विक्रेता बंधंूच्या शिल्पाकृतीचे’ लोकार्पण मंगळवारी ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते गजानन मेश्राम यांच्या हस्ते नागपुरात करण्यात आले. पत्रकार दिनाचे औचित्य साधून संविधान चौकात झालेल्या या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन खा. विजय दर्डा, लोकमत मीडिया प्रा.लि.चे कार्यकारी संचालक करण दर्डा आदी मान्यवर उपस्थित होते.
‘वृत्तपत्र विक्रेता बंधंूच्या शिल्पाकृतीचे’ लोकार्पण
By admin | Updated: January 7, 2015 02:43 IST