संत अन् आधुनिक साहित्यातील बंध उलगडणार

By Admin | Updated: December 11, 2014 01:38 IST2014-12-11T01:38:03+5:302014-12-11T01:38:03+5:30

मी संत आणि आधुनिक साहित्य यांच्यातील बंध उलगडणार असल्याचे नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले.

Relations between saints and modern literature will be revealed | संत अन् आधुनिक साहित्यातील बंध उलगडणार

संत अन् आधुनिक साहित्यातील बंध उलगडणार

डॉ. सदानंद मोरे : ‘रिकामटेकडय़ांचा उद्योग’वरही मार्मिक टिप्पणी
पुणो : पंजाबमध्ये घुमान येथे संत नामदेवांच्या कर्मभूमीत होत असलेल्या साहित्य संमेलनात संत साहित्याचा अभ्यासक म्हणून मी संत आणि आधुनिक साहित्य यांच्यातील बंध उलगडणार असल्याचे नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले.
88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना अध्यक्षपदाची भूमिका विशद केली. मराठी भाषेशी संबंधित विविध मुद्दय़ांवरही त्यांनी भाष्य केले. संमेलनाध्यक्षपद ही एक खूप मोठी जबाबदारी आह़े महाराष्ट्रातील प्रतिनिधींनी माङयावर जो विश्वास दाखविला तो सार्थकी करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन, असेही ते म्हणाले. 
साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकडय़ांचा उद्योग आहे, असे विधान ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी नुकतेच केले होते. त्याबद्दल बोलताना साहित्य किंवा संमेलन हा संस्कृतीचा एक भाग आहेत. ज्या लोकांना वेळ आहे तेच साहित्याचे उद्योग करू शकतात. रिकाम्या वेळेशिवाय साहित्य निर्माण होत नाही, अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली. ते म्हणाले, आज जागतिकीकरणाच्या प्रवाहात भाषा, संस्कृती धोक्यात आली आहे. याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आपण कोण आहोत, आपली पाळेमुळे काय आहेत, याचा विचार झाला पाहिजे. साहित्यिकांनी भूतकाळ आणि वर्तमानकाळातील परिस्थितीचा विचार करून वास्तवावर संवेदनशीलतने आणि तितकेच निर्भीडपणो लेखन केले पाहिजे. 
सध्या राज्यातील इंग्रजी शाळा बंद करून मराठी भाषेची सक्ती शाळांमध्ये केली पाहिजे, असा एक विचारप्रवाह पुढे येत आहे. मात्र सक्ती करणो योग्य नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मूल आईपासून का तुटते, आईचे दूध त्याच्यासाठी पुरेसे असत नाही का, अशा दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहिले पाहिजे. भाषेच्या सक्तीचा नीट विचार केला पाहिजे. भाषा सल्लागार समितीने भाषेचे धोरण करण्यासंबंधी जो मसुदा शासनाला दिला आहे, त्याचा सारांश लक्षात घेतला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संमेलनाध्यक्ष निवडीनंतर साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनील महाजन यांनी डॉ. मोरे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. (प्रतिनिधी)  
 
निवडणुकीदरम्यान कोणताही वाद झाला नाही, हे यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्टय़ ठरले. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत कमालीची पारदर्शकता ठेवण्यात आली होती. - अॅड. प्रमोद आडकर
 
यंदाच्या निवडणुकीत मतदारांमध्ये मोठय़ा प्रमाणात जागृती झाल्याने विक्रमी मतदान झाले. सर्वानी एकमताने डॉ. मोरे यांच्या बाजूने कौल दिला. मतदारांच्या इच्छेप्रमाणो त्यांची निवड योग्य असू शकत़े -भारत सासणो, साहित्यिक 
 
प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून सौजन्याची वागणूक मिळाली. कवी कै. दिलीप चित्रे आणि म. पां बहिरट यांना हा माझा विजय समर्पित करीत आहे.
- डॉ. सदानंद मोरे
 
लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, कीर्तनकार म्हणून स्वतंत्र ओळख. तत्त्वज्ञान तसेच प्राचीन संस्कृती व इतिहास विषयात पदव्युत्तर (एमए) पदवी. ‘द गीता - अ थिअरी ऑफ ह्युमन अॅक्शन’ यावर पीएच.डी संशोधन. सवरेत्कृष्ट प्रबंधासाठी गुरुदेव दामले पुरस्काराचे मानकरी. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मिळालेल्या  ‘करिअर अॅवार्ड’अंतर्गत ‘कृष्ण : द मॅन अँड हिज मिशन’ विषयावर पदव्युस्तर संशोधन. पुणो विद्यापीठांतर्गत विविध अध्यासनांचे समन्वयक प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे कार्यरत. संत तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून मिळालेला सांस्कृतिक वारसा बहुविद्या शाखीय व्यासंगाने अधिक समृद्ध करणारे विचारवंत म्हणून मान्यता. ‘द गीता : थेअरी ऑफ ह्युमन अॅक्शन’, ‘गीतारहस्याची निर्मिती’, ‘पालखी सोहळा’, ‘ताटीचे अभंग’, ‘ज्ञानबा-तुकाराम’ यासारख्या संत साहित्यविषयक तसेच सामाजिक ग्रंथांचे लेखन, संपादन. विविध चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळेत शोधनिबंधांचे वाचन, व्याख्याने. ‘तुकाराम दर्शन’ ग्रंथासाठी साहित्य अकादमीसह विविध 15 संस्थांच्या पुरस्काराने सन्मानित. ‘उजळल्या दिशा’ नाटकासाठी राज्य शासनासह विविध पुरस्कारांचे मानकरी.  
 

 

Web Title: Relations between saints and modern literature will be revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.