गणेश पांडेचे अंडरवर्ल्डशी संबंध - जावकर

By Admin | Updated: March 31, 2016 02:05 IST2016-03-31T02:05:11+5:302016-03-31T02:05:11+5:30

गणेश पांडे पांडेचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप त्याच्याविरोधात विनयभंगाची तक्रार करणाऱ्या मैथिली जावकरने एका वृ्ततवाहिनीशी बोलताना आज केला. गणेश पांडे हा धादांत खोटे

Relation with Ganesh Pandey's underworld - | गणेश पांडेचे अंडरवर्ल्डशी संबंध - जावकर

गणेश पांडेचे अंडरवर्ल्डशी संबंध - जावकर

मुंबई : गणेश पांडे पांडेचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप त्याच्याविरोधात विनयभंगाची तक्रार करणाऱ्या मैथिली जावकरने एका वृ्ततवाहिनीशी बोलताना आज केला. गणेश पांडे हा धादांत खोटे बोलत आहे. त्याच्याकडे मनी आणि मसल पॉवर आहे. त्याचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. त्यामुळे मी त्याच्याविरुद्ध तक्रार करायला घाबरत होते. पण, आता मी न घाबरता त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करणार असल्याचेही मैथिलीने स्पष्ट केले.
मी नार्काे टेस्टसाठी तयार आहे. आधी माझी नार्काे टेस्ट करा. नंतर त्याची नार्काे टेस्ट करा. त्यानंतर त्या रेल्वेच्या डब्यात असणाऱ्यांची ही नार्काे टेस्ट करा. पण, त्याच्याविरुद्ध बोलायला सगळेच घाबरत असल्याचे जावकर यांनी म्हटले आहे.
पांडे याने स्वत:वरील सर्व आरोप फेटाळले होते. ४ मार्चला विनयभंग केल्याचा दावा करणारी महिला पुढचे दोन दिवस आमच्यासोबत कशी
होती, असा सवालही त्याने उपस्थित केला. ७ मार्चला व्हॉट्स अ‍ॅपवर मला तिने कौतुकाचा मेसेज कसा
पाठवला, असा सवालही त्याने
उपस्थित केला. यानंतर पहिल्यांदाच बुधवारी मैथिली मीडियासमोर आली. आणि तिने आपली बाजू मांडली. (प्रतिनिधी)

Web Title: Relation with Ganesh Pandey's underworld -