ओबामांच्या दौऱ्याच्या खर्चाची माहिती देण्यास नकार
By Admin | Updated: May 5, 2015 01:35 IST2015-05-05T01:35:56+5:302015-05-05T01:35:56+5:30
भारत दौऱ्यावर आलेल्या अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्यासाठी केलेल्या खर्चाचा तपशील देण्यास नकार दिला आ

ओबामांच्या दौऱ्याच्या खर्चाची माहिती देण्यास नकार
मुंबई : भारत दौऱ्यावर आलेल्या अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्यासाठी केलेल्या खर्चाचा तपशील देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे परराष्ट्र संबंधावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करीत या दौऱ्यावर केलेल्या खर्चाची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने नाकारली आहे.
ओबामा हे पत्नी मिशेल व अधिकाऱ्यांच्या फौजफाट्यासह २५ ते २७ जानेवारीदरम्यान भारत भेटीवर आले होते. त्यानिमित्त दिल्लीमध्ये अभूतपूर्व सुरक्षाव्यवस्था राबविण्यात आली होती. त्यांच्या या पूर्ण दौऱ्यावर किती खर्च करण्यात आला, पाहुण्यांच्या निवासस्थान व प्रवासासाठी किती मनुष्यबळ वापरण्यात आले आणि त्यासाठी आलेल्या खर्चाची सविस्तर माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागविली होती. त्याबाबत परराष्ट्र मंत्रालयातील उप मुख्य प्रोटोकॉल अधिकारी रोहित रथिश यांनी कळविले, की प्रत्येकवर्षी सरकार अनेक परदेशी गणमान्य व्यक्ती ज्या भारतात येतात त्यांचे आदरातिथ्य करीत असते. हे दौरे प्रतिनिधिमंडळाचे स्वरूप, प्रयोजन, वर्गीकरण, संघटन, पाहुणचार कसा केला आणि कोणकोणत्या शहरांचा दौरा केला गेला, या दृष्टिकोनातून वेगवेगळे नियोजन केलेले असते.
ही बाब संवेदनशील असून, ती उघड झाल्यास त्याचा प्रतिकूल परिणाम देशाच्या परराष्ट्र संबंधांवर होऊ शकतो, अशी माहिती देण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)