राज्यपालांच्या हस्तक्षेपानंतर रायगड किल्ल्यावरील वीज पुरवठा पूर्ववत
By Admin | Updated: October 27, 2014 20:50 IST2014-10-27T20:48:14+5:302014-10-27T20:50:18+5:30
केंद्रीय पुरातत्व खात्याने वीज बिल न भरल्याने अंधारात लोटलेल्या रायगड किल्ल्यावरील वीज पुरवठा सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्तक्षेपानंतर पूर्ववत करण्यात आला.

राज्यपालांच्या हस्तक्षेपानंतर रायगड किल्ल्यावरील वीज पुरवठा पूर्ववत
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - केंद्रीय पुरातत्व खात्याने वीज बिल न भरल्याने अंधारात लोटलेल्या रायगड किल्ल्यावरील वीज पुरवठा सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्तक्षेपानंतर पूर्ववत करण्यात आला. भविष्यात अशी नाचक्की होऊ नये यासाठी वीज बिल वेळेत भरले जाईल याची दक्षता घ्यावी असे निर्देशही राज्यपालांनी रायगडच्या जिल्हाधिका-यांना दिले आहेत.
किल्ले रायगडावरील पथ दिव्यांचे वीज बिल गेल्या दोन वर्षांपासून थकीत असल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, जगदीश्वर मंदिराचा परिसर ऐन दिवाळीत काळोखात बुडाला होता. वीज पुरवठा नसल्याने गडावरील पाणी पुरवठाही बंद होता. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण होते. अखेर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करुन तोडगा काढला. राज्यपालांनी महावितरणच्या अधिका-यांना वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देश दिले व दुपारनंतर वीज पुरवठा पूर्ववत झाला.