मातृत्वामुळे कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाची जडणघडण
By Admin | Updated: August 3, 2014 00:40 IST2014-08-03T00:40:03+5:302014-08-03T00:40:03+5:30
डॉ़ रघुनाथ माशेलकर आणि डॉ़ सदानंद मोरे या दोघांमध्ये एक साम्य आहे की, त्यांच्या कर्तृत्वामध्ये त्यांच्या मातेचे अपार कष्ट आहेत़

मातृत्वामुळे कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाची जडणघडण
पुणो : डॉ़ रघुनाथ माशेलकर आणि डॉ़ सदानंद मोरे या दोघांमध्ये एक साम्य आहे की, त्यांच्या कर्तृत्वामध्ये त्यांच्या मातेचे अपार कष्ट आहेत़ मी स्वत: आईचे प्रोत्साहन व पाठिंब्यामुळे ही वाटचाल करू शकलो़ मातृत्वामुळेच या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होऊ शकली़ एक प्रकारे हा कर्तृत्ववान मातेचा गौरव करणारा सोहळा असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केल़े
महापालिकेतर्फे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ़ रघुनाथ माशेलकर आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा़ डॉ़ सदानंद मोरे यांचा पवार यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला़ ंया वेळी ते बोलत होत़े
पवार म्हणाले, ‘डॉ़ माशेलकर यांचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविले गेल़े स्वामित्व हक्का विषयीची लढाई त्यांच्यामुळे आपण जिंकली़ पॉलिमर सायन्स इंजिनिअरिंगच्या क्षेत्रत त्यांचे मोठे योगदान आह़े अशा योगदानाची सुरुवात पुण्यातून झाली़ संत तुकाराम महाराज यांच्या साहित्येचे अभ्यासक असलेले डॉ़ सदानंद मोरे यांची अभ्यासूवृत्ती, शिक्षकी पेशाला मिळालेला घरातून आधार याच्या बळावर त्यांनी उत्तम साहित्यनिर्मिती केली़ चांगल्या गुणांचा गौरव करण्याची परंपरा त्यांनी अखंड सुरू ठेवली़’ मोरे म्हणाले, ‘महाराष्ट्राचे महत्त्व महाराष्ट्राला कळले नाही़ भारत हा धर्मनिरपेक्ष ही संकल्पना मराठय़ांनी सर्वप्रथम दिली़ अब्दालीचे आक्रमण परतविण्यासाठी मराठय़ांनी देशातील सर्व राजे-महाराजांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला़’ या वेळी महापौर चंचला कोद्रे, खासदार वंदना चव्हाण, आमदार बापूसाहेब पठारे, डॉ़ शां़ब़ मुजुमदार, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, उल्हास पवार, अंकुश काकडे, सुभाष जगताप उपस्थित होत़े सुधीर गाडगीळ यांनी मानपत्रचे वाचन केल़े (प्रतिनिधी)
आपण अल्पसंतुष्ट असतो़ हा प्रवास सतत चालू राहिला पाहिज़े मी सीएसआरआयचा महासंचालक म्हणून निवृत्त होताना, पंतप्रधान मनमोहनसिंग म्हणाले होते, तुङो चांगले काम अजून व्हायचे आह़े तेव्हा जेवढा मी व्यस्त होतो़ त्याच्या तिप्पट काम आता करीत आह़े
- डॉ. रघुनाथ माशेलकर