शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्पबाधितांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई द्या, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 21:31 IST

मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पबाधितांनी लवकरात लवकर आपल्या हरकती लवादाकडे दाखल कराव्यात. असे आवाहन प्रकल्प बाधितांना करतानाचा या चौपदरीकरणामुळे बाधित झालेल्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्यात यावी, असे निर्देश राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

कणकवली : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पबाधितांनी लवकरात लवकर आपल्या हरकती लवादाकडे दाखल कराव्यात. असे आवाहन प्रकल्प बाधितांना करतानाचा या चौपदरीकरणामुळे बाधित झालेल्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्यात यावी, असे निर्देश राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.महामार्ग चौपदरीकरणात कणकवली शहरातील जमीन तसेच मालमत्ता जाणाऱ्या प्रकल्पबाधितांवर नुकसानभरपाई देताना अन्याय होत आहे. त्यामुळे या प्रकल्प बाधितांना शासनाने न्याय द्यावा. तसेच योग्य तो मोबदला द्यावा. या मागणीसाठी गुरुवारी मुंबई येथे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, राजन तेली यांच्यासह महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच इतर खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी, प्रकल्प बाधितांचे प्रतिनिधी म्हणून उदय वरवडेकर, विलास कोरगावकर, नितीन पटेल तसेच अन्य व्यापारीही उपस्थित होते.महसूलमंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीत प्रमोद जठार तसेच प्रकल्प बाधितांच्या प्रतिनिधींनी विविध समस्या तसेच नुकसानभरपाई देताना आढळलेल्या त्रुटी सविस्तर मांडल्या. नुकसानभरपाईच्या विविध उदाहरणांसह कागदपत्रांच्या माध्यमातून महसूलमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. योग्य मोबदला न मिळाल्यास प्रकल्पबाधित लोक उद्ध्वस्त होणार असल्याचे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. प्रकल्पबाधितांचे सविस्तर म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महसूलमंत्री पाटील यांनी शासन प्रकल्पबाधितांना निश्चित असा न्याय देईल. तसेच प्रकल्प बाधितांनी त्यांच्या हरकती लवकरात लवकर लवादाकडे दाखल कराव्यात, असे सांगितले. त्याचबरोबर प्रकल्प बाधितांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती प्रमोद जठार यांनी दिली.मागण्या पूर्ण न झाल्यास संघर्ष करण्याचा निर्धार !मुंबई येथे गुरुवारी महसूलमंत्री यांच्या समवेत प्रकल्प बाधितांची बैठक होणार असल्याने त्याच्यापुढे आपल्या मागण्या ठेवण्यासाठी बुधवारी सायंकाळी कणकवली येथील गांगोमंदिरात प्रकल्प बाधितांनी बैठक घेतली होती. मागण्या निश्चिती बरोबरच मुंबई येथील बैठकीसाठी प्रतिनिधींची नावेही निश्चित करण्यात आली होती. तसेच आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलhighwayमहामार्ग